आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'धग\' ठरला करिअरचा माईलस्टोन - उषा जाधव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच 60 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीने आपला झेंडा रोवला आहे. कारण सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, पार्श्वगायन, संगीत या सर्वच प्रकारात मराठी कलाकारांना पुरस्कार मिळाला आहे.

अभिनेत्री उषा जाधवला 'धग' या सिनेमातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर याच सिनेमासाठी शिवाजी पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

'संहिता' या मराठी सिनेमातील सर्वोत्कृष्ट संगीतासाठी शैलेंद्र बर्वे यांना तर याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार गायिका आरती अंकलिकर-टीकेकर यांना जाहीर झाला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर या कलाकारांची पहिली प्रतिक्रिया काय होती हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...