आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेशने जेनेलियाला दाखवला 'बॉबी जासूस', अनेक सेलिब्रिटींनीही बघितला सिनेमा, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री सोफी चौधरी, अभिनेता आदित्य रॉय कपूर, रितेश देशमुख आणि जेनेलिया
मुंबई - अभिनेत्री विद्या बालनचा 'बॉबी जासूस' हा सिनेमा आज सर्वत्र रिलीज झाला. सिनेमाच्या रिलीजपूर्वी गुरुवारी मुंबईत त्याचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यामध्ये बी टाऊनमधील बरीच मंडळी सहभागी झाली होती.
स्क्रिनिंगमध्ये सामील झालेल्या सेलेब्समध्ये अभिनेता आदित्य रॉय कपूर, अभिनेत्री सोफी चौधरी, आर माधवन, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, जॅकी भगनानी, वाशू भगनानी यांचा समावेश होता. अभिनेता रितेश देशमुख पत्नी जेनेलियासह स्क्रिनिंगमध्ये पोहोचला होता. जेनेलिया प्रेग्नेंट आहे, त्यामुळे प्रत्येक इवेंटमध्ये रितेश आवर्जुन तिच्यासह हजर असतो.
'बॉबी जासूस' हा सिनेमा समर शेख यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात विद्या वेगवेगळ्या बारा रुपात झळकली आहे. दीया मिर्झा या सिनेमाची निर्माती आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...