आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Screening Of Marathi Film Aandhali Koshimbir

PICS : \'आंधळी कोशिंबीर\'च्या स्क्रिनिंगला सईसह पोहोचले अनेक मराठी सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शुक्रवारी वंदना गुप्ते आणि अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला आंधळी कोशिंबीर हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाच्या रिलीजपूर्वी गुरुवारी मुंबईतील लोअर परेल येथील पीव्हीआरमध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींसाठी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला सिनेमातील संपूर्ण स्टारकास्टसह अनेक मराठी सेलेब्स आवर्जुन हजर होते.
कोणकोणते सेलेब्स आले होत?
या स्क्रिनिंगला दिग्दर्शक महेश लिमये, मुग्धा गोडसे, मृणाल देशपांडे, अतुल कुलकर्णी, सई ताम्हणकर, सुनील बर्वे यांच्यासह सिनेमातील स्टारकास्ट अर्थातच अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते, आनंक इंगळे, हृषिकेश जोशी, प्रिया बापट, मृण्मयी देशपांडे, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, निर्माती अनुया म्हैसकर, दिग्दर्शक आदित्य इंगळे हजर होते.

सिनेमाची स्टोरीलाइन...

या सिनेमात 8 विनोदी पात्रे असून, मात्र त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. बावळट, चिडका, सिरीयस, दमदाटीपणाने वागतच विनोदी भूमिका करणारा यासह अन्य स्वभाव या आठ जणातून व्यक्त होतो. जेव्हा वेगवेगळ्या स्वभावाची विचित्र माणसे एकाचवेळी भेटतात आणि त्यातून निर्माण होणारे विनोदी किस्से हे या सिनेमातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
'आंधळी कोशिंबीर' या सिनेमाची कथा प्रताप देशमुख यांची असून, पटकथा व संवाद आदित्य इंगळे आणि प्रताप देशमुख यांनी लिहिलेली आहे. सिनेमात तीन सुरेल गीते असून, गाण्यांना शंकर महादेवन, अवधूत गुप्ते, जान्हवी प्रभू अरोरा आणि विभावरी आपटे जोशी यांनी आवाज दिला आहे. वेशभूषा सोनिया सहस्त्रबुद्धे यांनी तर नृत्य दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे हिने केले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'आंधळी कोशिंबीर' या सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी क्लिक झालेली मराठी सेलेब्सची खास छायाचित्रे...