आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : \'नारबाची वाडी\' बघायला पोहोचले मराठी आणि हिंदी सेलिब्रिटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'नारबाची वाडी' हा सिनेमा आज (शुक्रवारी) रिलीज झाला. या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक नावाजलेले चेहरे दिसले.

गाजलेल्या अनेक हिंदी मालिकांची निर्मिती केलेल्या कल्याण गुहा आणि रुपाली गुहा यांच्या 'फिल्म फार्म' ने नारबाची वाडी' या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे कल्याण गुहा आणि रुपाली गुहा यांच्या सध्या गाजत असलेल्या 'उतरन' मालिकेतील कलाकारही या सिनेमा स्क्रिनिंगमध्ये दिसले.

'शज्जानो बागान' या मनोज मित्र लिखित गाजलेल्या कादंबरीवर 'नारबाची वाडी' हा सिनेमा आधारित आहे. दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, विकास कदम, अतुल परचुरे या सिनेमात मेन लीडमध्ये आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा 'नारबाची वाडी' बघायला आलेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे... ...