आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics: प्रियांका चोप्राने ठेवले 'मेरी कोम'चे खास स्क्रिनिंग, पोहोचले अनेक सेलेब्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('मेरी कोम'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेली प्रियांका चोप्रा)

मुंबई:
प्रियांका चोप्राचा 'मेरी कोम' हा आगामी 5 सप्टेंबरला रिलीज होत आहे. त्यापूर्वी सिनेमाच्या स्क्रिनिंगचे आयोजन केले जात आहे. काल रात्री (1 सप्टेंबर) प्रियांकाने एका स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. त्यामध्ये बी-टाऊनच्या अनेक सेलेब्सनी उपस्थिती लावली.
स्क्रिनिंगमध्ये निर्माते रमेश तौराणी पत्नी स्नेहासह पोहोचले होते. विनोदवीर भारती सिंह बॉयफ्रेंड हर्ष लिंबचियासह सामील झाली होती. प्रियांकाचा भाऊ सिध्दार्थ चोप्रा मित्रांसह या स्क्रिनिंगमध्ये सहभागी झाला होता. निर्माते संजय लीला भन्साळी आई लीला भन्साळी आणि बहीण बेला सहगलसोबत आले होते. मुंबईमध्ये पाऊस चालू असल्याने स्क्रिनिंगमध्ये सामील झालेल्या सेलेब्सची संख्या कमी होती.
'मेरी कोम' महिला बॉक्सर एमसी मेरी कोमच्या जीवनपटावर बेतलेला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन उमंग कुमारने केले आहे. सिनेमात प्रियांकासह सुनील थापा, दर्शन कुमार, शिशिर शर्मासुध्दा दिसणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सचे Pics...