(अभिनेत्री साशा आगा आणि विनोद खन्ना)
मुंबईः आनंद कुमार दिग्दर्शिक 'देसी कट्टे' हा सिनेमा आज सिल्व्हर स्क्रिनवर दाखल झाला आहे.
बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कसे प्रदर्शन करणार याचा निर्णय विकेण्डनंतरच होईल. सिनेमाच्या रिलीजपूर्वी म्हणजे गुरुवारी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बी टाऊनमधील बरेच सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
मुंबईतील मल्टीप्लेक्समध्ये आयोजित या स्क्रिनिंगमध्ये अभिनेता विनोद खन्ना, साशा आगा, टिया बाजपेयी, अखिल कपूर, रवि किशन, संग्राम सिंह, गायिका शिबानी कश्यप आणि तिचे पती राजीव, सुफी गायक कैलाश खेर आणि त्याची पत्नी शीतल आणि मुलगा कबीर सहभागी झाले होते. याशिवाय गायक राघव सचर, अभिनेत्री अमृता पाठक आणि साशा आगाची आई सलमा आगासुद्धा स्क्रिनिंगला आवर्जुन हजर होत्या. 'देसी कट्टे' या सिनेमात सुनील शेट्टी, जय भानूशाली, अखिल कुमार आणि साशा आगा यांच्या भूमिका आहेत. आनंद कुमार या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'देसी कट्टे'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलिब्रिटींची छायाचित्रे...