आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅपर यो यो हनीसिंगची खिल्ली उडणारा व्हिडिओ सोशल साइट्सवर झाला व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओ पाहण्यासाठी वर क्लिक करा...)
मुंबई: रॅपर यो यो हनीसिंगच्या गाण्यांची खिल्ली उडवणारा व्हिडिओ सोशल साइट्सवर सध्या खूप लोकप्रिय होत आहे. हा स्पूस व्हिडिओ सोशल साइट्सवर बराच शेअरही केला जात आहे. या व्हिडिओमध्ये हनीसिंगच्या पात्रात दिसणारा एक युवक ठिक-ठिकाणी तरुणींकडून कानशिलात खाताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला एक कार दाखवण्यात आली आहे. परंतु हनीसिंगच्या गाण्याची धून वाजताच तो तरुण सायकलवरून निघतो. हा व्हिडिओ आर्टिस्ट ऑन वर्क प्रॉडक्शनने बनवला आहे.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला युवक प्रत्येक गोष्टीचे उत्तर हनीसिंगच्या स्टाइल आणि गाण्यात देतो. हनीसिंगच्या गेटअपमधील हा युवक विविध ठिकाणी त्याच्या गाण्यात उत्तर द्यायला लागला तर लोक त्याच्या कानाशिलात लगावतात. त्याला कुणी तू काय करतोस असे विचारल्यानंतर तो म्हणतो, 'चार बोटल व्होडका, काम मेरा रोज का'
जेव्हा तो एका तरुणीला म्हणतो, 'मै वो लडका नही जो तेरे साथ पढता हू'. ती हे ऐकताच त्याला थप्पड मारते. व्हिडिओमध्ये आणखी एक सीन देण्यात आला आहे. त्यात एक तरुणी त्याला ओळख नाही असे म्हणताच तो तिला म्हणतो, 'मुझे ना पहचाने तू, तेरे घर अखबार नही आता?' पुन्हा एकदा तो तिच्या हातून थप्पड खातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हिडिओमधून घेण्यात आलेली इतर 9 छायाचित्रे...