• Home
  • News
  • Spotted Aishwarya Rai Bachchan On The Sets Of 'Jazbaa'

PHOTOS: 'जज्बा'चे शूटिंग / PHOTOS: 'जज्बा'चे शूटिंग सुरु, सेटवर दिसली ऐश्वर्या

दिव्य मराठी नेटवर्क

Feb 05,2015 01:59:00 PM IST
(शूटिंग सेटवर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन)

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या आगामी 'जज्बा' या सिनेमाचे शूटिंग सुरु केले आहे. या सिनेमाद्वारे ऐश्वर्या बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तब्बल पाच वर्षांनी पुनरागमन करत असलेल्या ऐश्वर्याच्या या सिनेमाचे दिग्दर्शक संजय गुप्ता हे आहेत. ऐश्वर्यासोबत इरफान खान, शबाना आझमी आणि अनुपम खेर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका 'जज्बा'मध्ये आहेत.
शूटिंग सेटवर ऐश्वर्यासोबत अभिनेता इरफान खानला बघितले गेले. या सिनेमात ऐश्वर्या एका वकिलाच्या भूमिकेत आहे. तिचा अॅक्शन अवतार प्रेक्षकांना 'जज्बा'मध्ये बघायला मिळणार आहे. संजय गुप्ता यांच्या मते, ऐश्वर्याचा ब्रॅण्ड न्यू अवतार सिनेमात बघायला मिळेल. या अॅक्शन ड्रामा सिनेमात इरफान खानने पोलिस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. अद्याप सिनेमाची रिलीज डेट निश्चित करण्यात आलेली नाही, मात्र यावर्षाच्या शेवटी-शेवटी सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्याची शक्यता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शूटिंग सेटवर क्लिक झालेली ऐश्वर्या आणि इरफानची छायाचित्रे...
X
COMMENT

Recommended News