आज सर्वत्र गणेश चतुर्थीचा सण उत्साहात साजरा होतोय. गणेशाच्या आगमानाच्या निमित्ताने अभिनेत्री स्पृहा जोशी, गायक मंगेश बोरगावकर आणि संगीतकार निलेश मोहरीर यांनी आपले एक नवीन गाणे नुकताच लाँच केले. मुंबईतील सिद्धीविनायकाच्या चरणी या तिघांनी 'लााऊंज गणेशा' हे नवीन गाणे लाँच केले.
हे गाणे अभिनेत्री आणि कवियत्री म्हणून ओळखल्या जाणा-या स्पृहा जोशीने लिहिले असून निलेश मोहरीर यांनी ते संगीतबद्ध केले आहे. तर मंगेश बोरगावकरने ती स्वरबद्ध केली आहेत. गणेशोत्सवात या नवीन गाण्याची भेट स्पृहाने आपल्या चाहत्यांना दिली आहे.
या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, दोन संगीतपद्धतींचा मिलाफ करुन 'फ्युजन' असा संगीतप्रकार उदयास आला आहे आणि याच फ्युजनमधून थोडासा आगळावेगळा प्रयोग तरुण संगीतकार निलेश मोहरीर यांनी केला आहे. निलेश यांच्या 'स्पिरिच्युअल स्पा' या निर्मितीचे हे पहिले गाणे आहे. लवकरच हे नवीन गाणे डाऊनलोडिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा सिद्धीविनायकाच्या मंदिरात अल्बम लाँचवेळी क्लिक करण्यात आलेली ही खास छायाचित्रे...