(SIIMAमध्ये परफॉर्म करताना अभिनेत्री श्रेया सरन आणि अवॉर्ड घेतल्यानंतर ब्रह्मानंद)
मुंबईः साउथ इंडियन इंटरनॅशनल मुव्ही अवॉर्ड्स (SIIMA)च्या शेवटच्या दिवशी अनेक रंग बघायला मिळाले. या इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी एकीकडे उपस्थितांना श्रेया सरनच्या दिलखेचक अंदाजाने आकर्षित केले, तर दुसरीकडे अनेक सेलिब्रिटींचा हटके अंदाजसुद्धा चर्चेत राहिला.
मलेशियात दोन दिवस चाललेल्या या इव्हेंटचा समारोप झाला आहे. शेवटच्या दिवशी दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज दिग्दर्शक के. राघवेंद्र राव यांना जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीदेवी आणि चिरंजीवी यांनी हा सन्मान त्यांना बहाल केला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा SIIMAमध्ये क्लिक झालेली सेलिब्रिटींची आणि श्रेया सरनच्या परफॉर्मन्सची खास छायाचित्रे...