आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: श्रीदेवीने लाँच केला \'हवा हवाई\'चा फस्ट लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडची मिस 'हवा हवाई' म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवीने याच शीर्षकावर आधारित हवा हवाई या आगामी सिनेमाचा फस्ट लूक लाँच केला. मुंबईत हा लाँचिंग सोहळा पार पडला. अमोल गुप्ते दिग्दर्शित या सिनेमात त्यांचा मुलगा पार्थो गुप्ते मेन लीड साकारत आहे. हा सिनेमा येत्या 9 मे रोजी रिलीज होणार आहे.
श्रीदेवी मंचावर येताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. व्हाइट ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसली. 1987मध्ये आलेल्या 'मिस्टर इंडिया' या सिनेमातील हवा हवाई हे गाणे आजही लोकांच्या ओठी रेंगाळत असते.
'हवा हवाई' या सिनेमाच्या ट्रेलर लाँच करताना श्रीदेवी म्हणाली, ''मला अमोल गुप्तेंचे सिनेमे पसंत पडतात. ते प्रेक्षकांना आपल्या सिनेमाशी भावनिकरित्या एकरुप करतात. मला या सिनेमाचा ट्रेलर आवडला आहे.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'हवा हवाई'च्या ट्रेलर लाँचवेळी क्लिक झालेली खास छायाचित्रे...