आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Sridevi Sends Notice To Ram Gopal Verma For Renaming Savitri As Shridevi

राम गोपाल वर्मांवर श्रीदेवी भडकली, पाठवली कायदेशीर नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः श्रीदेवी आणि राम गोपाल वर्मा)
चित्रपट दिग्दर्शक-निर्माता राम गोपाल वर्मा अडचणीत आले आहेत. कारण अभिनेत्री श्रीदेवी त्यांच्यावर चांगलीच भडकली आहे. वर्मा यांनी आपल्या आगामी चित्रपटाचे नाव 'श्रीदेवी' ठेवल्याने श्रीदेवीने त्यांना कायदेशीर नोटीस बजावलीय. सुरुवातीला राम गोपाल वर्मांनी आपल्या नवीन चित्रपटाचे नाव 'सावित्री' ठेवले. पोस्टरमध्ये एक मुलगा तरुणीकडे टक लावून पाहत असल्याचे दाखवण्यात आले होते. या पोस्टरला लोकांनी आणि बाल हक्क संस्थांनी विरोध दर्शवल्यानंतर चित्रपटाचे नाव बदलून 'श्रीदेवी' असे करण्यात आले. कारण राम गोपाल वर्मांनी आपण अभिनेत्री श्रीदेवीचे चाहते असल्याचे अगोदरच जाहीर केले होते. तसेही रामू कुणाची जास्त प्रशंसा करत नाहीत, मात्र श्रीदेवीच्या 'इंग्लिश विंग्लिश'ची त्यांनी भरभरून प्रशंसा केली होती.
आता श्रीदेवीने रामूला कायदेशीर नोटीस पाठवून तीन दिवसांत चित्रपटाचे शीर्षक बदलण्यास सांगितले आहे. या चित्रपटाला 'श्रीदेवी' असे नाव दिल्याने माझी प्रतिमा खराब होत असल्याचे श्रीदेवीने म्हटले आहे. या चित्रपटाचा मजकूर अश्लील असल्याचे सांगण्यात येत आहे. एक लहान मुलगा एका तरुणीकडे आकर्षित होत असल्याची चित्रपटाची कथा आहे. श्रीदेवीने पाठवलेल्या नोटीसवर राम गोपाल वर्मा यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा राम गोपाल वर्मांच्या 'सावित्री' या सिनेमाचे पोस्टर्स...