आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SIIMA 2014: रेड कार्पेटवर दिसले चिरंजीवी, श्रेया श्रीदेवीसह अनेक सेलेब्स, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्रेया सरन, चिरंजीवी आणि श्रीदेवी)
मुंबई: साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA)चे आयोजन मलेशियाच्या कुआलालंपूरमध्ये करण्यात येत आहे. दोन दिवस चालणा-या या इव्हेंटचा शुक्रवारी (12 सप्टेंबर) पहिला दिवस होता. अशात साउथ फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडचे अनेक बॉलिवूड सेलेब्स कुआलालंपूरच्या नेगारा स्टेडिअममध्ये दिसले.
अभिनेत्री श्रीदेवी पती बोन कपूर आणि दोन मुली जान्हवी आणि खुशीसह दिसली. श्रीदेवी आणि बोनी इव्हेंटदरम्यान रेड कार्पेटवर दिसून आली. श्रीने यानिमित्त साडी नेसलेली होती. सोबतच, श्रेया सरनसुध्दा या इव्हेंटमध्ये सामील झाली होती. अभिनेत्री हुमा कुरेशी भाऊ साकिब सलीमसह पोहोचली होती. अवॉर्ड फंक्शनमध्ये सामील झाली होती. या अवॉर्ड सेरेमनीमध्ये अभिनेत्री तमन्ना भाटिया, अनिरुध्द, देवी श्री प्रसाद, श्रेया सरन, शिव राजकुमार, लक्ष्मी मेनन, निविन फुले, राकुल प्रीत सिंहसह अनेक स्टार्सनी उपस्थिती लावली होती.
SIIMA चेअरमन विष्णू इंदौर यांनी अवॉर्ड सेरेमनीसाठी मलेशियाला निवडले. त्यांनी सांगितले, 'भारतीय फिल्म येथे खूप प्रसिध्द आहेत. म्हणून आम्ही अव़र्ड सेनेमनीसाठी मलेशियाची निवड केली आहे.' या अवॉर्ड फंक्शनचा आज शेवटचा दिवस आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा SIIMAमध्ये सामील झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...