आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवी होणार राजकुमारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘इंग्लिश विंग्लिश’द्वारे भारतापासून ते जपानपर्यंतच्या चाहत्यांना आपल्या अभिनयाने मंत्रमुग्ध करणारी श्रीदेवी तामिळ सिनेमामध्ये पुनरागमन करत आहे. तिचा आगामी सिनेमा तामिळमध्ये असणार आहे. शिंबू देवनचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात तामिळ सिनमांचा सुपरस्टार विजय आणि कन्नडस्टार सुदीपदेखील असणार आहेत. ती यात एका राजकुमारीची भूमिका साकारणार आहे. कल्पनेवर आधारित असलेल्या यात जे राज्य वाईट शक्तींशी सामना करत आहे, त्या राज्याची ती राजकुमारी बनते. यापूर्वी ती ‘चंद्रमुखी’ आणि ‘खुदा गवाह’सारख्या सिनेमात राजकुमारी बनली आहे. श्रीदेवीला तिच्या मुलींनी हा सिनेमा करण्यासाठी मन वळवले आहे.