(श्रीदेवीची मुलगी जान्हवी आणि खुशी कपूर)
मुंबई: श्रीदेवी तिच्या दोन्ही मुली आणि पतीसह मलेशियाच्या कुआलालंपूरला गेली आहे. तिथे ते साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्समध्ये (SIIMA) सहभागी होण्यासाठी गेल्या आहेत. मलेशिया जाण्यापूर्वी ती मुलगी जान्हवी आणि खुशीसह एअरपोर्टवर दिसली होती. श्रीदेवी अनेकदा मोठी मुलगी जान्हवीसह दिसते. ती जेव्हा कधी भारताबाहेर गेली, की तिच्या मुली तिच्यासोबत दिसतात.
जान्हवी आणि खुशीने त्यांची काही छायाचित्रे सोशल साइट्सवर पोस्ट केली आहेत. या दोघी फिरायला गेल्यानंतर सोशल साइट्सवर फोटो पोस्ट करायला विसरत नाहीत. त्यांना आतापर्यंत जापान, यूरोपसारख्या देशांची भटकंती केली आहे. मालदीवमध्ये त्यांनी नवीन वर्ष साजरे केले होते. यावेळी सर्व कुटुंबीयांनी धमाल-मस्ती केली होती.
पार्टी आणि सेल्फीच्या शौकीन आहेत दोघी बहीणी
जान्हवी बहूधा आई श्रीदेवीसह पार्ट्यांमध्ये दिसते. ती पार्टीत सामील झालेली छायाचित्रेसुध्दा सोशल साइड्सवर पोस्ट करत असते. शिवाय इंस्टाग्रामवर ती प्रत्येक इव्हेंटची छायाचित्रे अपलोड करत असते. जान्हवी आणि खुशीला सेल्फीची आवड आहे. इंस्टाग्रामवर जान्हवीचे सहा हजार फॉलोअर्स आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जान्हवी आणि खुशीच्या भटकंतीची छायाचित्रे...