आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sridevi's Daughter Jhanvi Kapoor In Karan Johar's Next Film!

श्रीदेवीच्या मनाविरुद्ध बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास जान्हवी सज्ज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करण जोहरने आपल्या धर्मा प्रॉडक्शनद्वारे तयार करण्यात आलेल्या सिनेमांमध्ये नवीन कलावंतांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने 2013 मध्ये अलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या तीन नवीन कलावंतांना घेऊन ‘स्टुडेंट ऑफ द इयर’ हा चित्रपट बनवला. तो यशस्वीही ठरला. याद्वारे चित्रपटसृष्टीला तीन प्रतिभावंत अभिनेतेही मिळाले. आता करण जोहरची नजर श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवीवर आहे.
करणने आपल्या आगामी सिनेमासाठी जान्हवीचे नाव फायनल केल्याचे कळते. सिनेमाचा विषय, त्यातील कलावंत आणि सिनेमाचे नाव यावर करण आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शनने सध्या तरी बोलण्याचे टाळले आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्याकडूनही याबाबत कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. यापूर्वी जान्हवीला दक्षिण भारतीय सिनेमांच्या ऑफर येत असल्याच्या बातम्यांवर श्रीदेवी म्हणाल्या होत्या की, माझी मुलगी सध्या अभ्यासावर लक्ष देत आहे. त्यामुळे तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच ती करिअरचा विचार करेल.
जान्हवीची अनेकदा करणने घेतली भेट -
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिला कोणत्या प्रकारचे कथानक आवडेल, हे जाणून घेण्यासाठी करणने अनेकदा जान्हवीची भेट घेतली. अखेर, करणला जान्हवीसाठी कथानक सापडले आहे. करणच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जान्हवीनेही कंबर कसली आहे. तिने नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे.
लवकरच जान्हवीचे लग्न करण्याची श्रीदेवीची इच्छा -
श्रीदेवीने गेल्याच वर्षी स्पष्ट केले होते, की तिला जान्हवीचे लग्न लवकरात लवकर करायचे आहे. जान्हवीचे शिक्षण पूर्ण होताच तिचे लग्न करणार असे श्रीदेवीने म्हटले होते. आता खरंच जान्हवी श्रीदेवीच्या मनाविरोधात रुपेरी पडद्यावर आपले नशीब आजमावणार का? हे स्पष्ट होईल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा जान्हवीचा ग्लॅमरस अंदाज...