आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत शाहरुख-सलमानने पुन्हा एकदा घेतली गळाभेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये एकमेकांना अलिंगन देताना शाहरुख आणि सलमान)
बॉलिवूडचा दबंग आणि किंग खानने पुन्हा एकदा गळाभेट घेतली आहे. निमित्त होते, बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीचे. रमजान निमित्त दोन्ही खाननी एकमेकांना अलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. मात्र गळाभेट घेतल्यानंरही दोन्ही खानच्या चेह-यावर आनंद दिसला नाही. जवळपास पाच मिनीटांत दोघेही माध्यमांना न बोलता तिथून निघून गेले. 2013मध्येसुध्दा बाबा सिद्दीकी यांनी शाहरुख आणि सलमानला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हासुध्दा सिद्दीकी यांच्या येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शाहरुख आणि सलमान यांना त्या पार्टीत विशेष आमंत्रण देण्यात आले होते. सहा वर्षांमध्ये पहिल्यांदा दोन्ही स्टार्स असे एकमेकांना भेटले. त्यांच्यामधील वाद सर्वांनाच चांगला ठाऊक आहे.

जवळपास 6 वर्षांपूर्वी 2008मध्ये अभिनेत्री कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीमध्ये दोघांमध्ये खटके उडाले होते. तेव्हापासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. दोघे कोणत्याच कार्यक्रमात एकत्र दिसले नाहीत. एवढेच नाही तर, दोघांमुळे बॉलिवूड इंडस्ट्री दोन भागात वाटल्याचा भास होतो. तसेच, ऐश्वर्यावरूनसुध्दा त्यांच्यामध्ये वाद झाला होता.
असे मानले जात होते, की दोन्ही खान एकमेकांचा चेहरा बघणेदेखील पसंत करत नाहीत. परंतु 2013मध्ये त्यांनी पहिल्यांदा गळाभेट घेतली होती.
2013मध्ये पहिल्यांदा घेतली गळाभेट
2013मध्ये बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये दोघे एकत्र दिसले होते आणि मागील वाद विसरून एकमेकांना अलिंगन दिले होते. बॉलिवूडसाठी हा एक सर्वात खास क्षण होता. कारण 6 वर्षांनंतर दोघे एकत्र आले होते. दोघांच्या गळाभेटीवर सलमानचे वडील सलीम खान म्हणाले होते, की हा केवळ शिष्टाचार होता. ते दोघे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. कारण ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यानंतर स्टार गिल्ड अवॉर्डमध्ये सलमान खान आणि शाहरुख खानने पुन्हा एकदा गळाभेट घेतली होती.
आनंदी दिसले नाही दोन्ही खान
रविवारी (6 जुलै) आयोजित बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये दोन्ही खानने गळाभेट घेतली, मात्र यावेळी दोघांच्या चेह-यावर आनंद दिसला नाही.
पुन्हा होऊ शकतो आमना-सामना
दोघे इथे चागंल्या मनस्थितीत दिसले नसले तरी, दोघांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. काही दिवसांतच, दोघांचा पुन्हा आमना-सामना होण्याची शक्यता आहे. बातमी अशी आहे, की राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांच्या येथे आयोजित होणा-या इफ्तार पार्टीमध्ये दोघांना आमंत्रित केल्या जाऊ शकते. मात्र दोघांपैकी कोण पार्टीत जाणार हे सांगणे थोडे कठिण आहे. परंतु दोघांच्या उपस्थितीच्या बातम्यांनी राणी आणि आदित्यची इफ्तार पार्टी आयोजना आधीच चर्चेत आली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इफ्तार पार्टीमध्ये पोहोचलेल्या सलमान आणि शाहरुखची छायाचित्रे...