आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'माझ्या चुंबन दृश्यामध्ये भडकपणा नसतो', इति श्रद्धा कपूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(श्रद्धा कपूर)

'आशिकी 2' आणि 'एक व्हिलन'नंतर श्रद्धा कपूरने आपल्या आगामी 'हैदर'मध्ये चुंबन दृश्ये दिली आहेत. या दृश्यांना ती सामान्य स्पर्श असल्याचे सांगते. शिवाय दीपिका पदुकोनने प्रसार माध्यमांविरोधात घेतलेल्या कणखर भूमिकेलादेखील श्रद्धाने आपला पाठिंबा दर्शवला आहे.
बॉलिवूडमध्ये चार वर्षे आणि पाच चित्रपट जुनी असलेल्या श्रद्धा कपूरचे मागील दोन चित्रपट सुपरहिट ठरले. आता शाहिद कपूरसोबतचा तिचा 'हैदर' ऑक्टोबर महिन्यात रिलीज होत आहे. 'आशिकी-2' आणि 'एक व्हिलन'च्या यशामध्ये मोठा वाटा असलेल्या श्रद्धाची चर्चा तिच्या कथित प्रियकरामुळेही सुरू आहे. आदित्य रॉय कपूरसोबत असलेल्या नात्याची चर्चा तर 'आशिकी-2'च्या रिलीजपूर्वीपासून सुरू झाली होती. कालांतराने दिग्दर्शक मोहित सूरीसोबतदेखील तिचे नाव जोडण्यात आले. सध्या श्रद्धाच्या घराबाहेर आदित्य फिरत असल्याच्या, तसेच परदेशात सुटी साजरी करण्यास गेल्याच्या आणि हिऱ्याची अंगठी खरेदी केल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. यात काही तथ्य आहे का, असे विचारल्यानंतर श्रद्धाने स्वत:ला 'सिंगल' म्हणत जास्त बोलण्यास टाळले.
पुढे वाचा, काय म्हणाली श्रद्धा कपूर...