आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुप्तेंना बरेच काही खुपते!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सगळ्यांना काय खुपते हे उलगडून सांगणार्‍या अवधूत गुप्तेंना नेमके काय खुपते, याचा उलगडा त्यांनी अलीकडेच केला. ‘तरुणांमधील वाढलेली कंपूशाही, राजकीय अस्थिरता, दिसेल त्या गोष्टीवर टीका करण्याची वृत्ती’ असे बरेच काही मला खुपते, असे ते म्हणाले.
औरंगाबादेत आले असता त्यांनी त्यांच्या ‘जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा’ चित्रपटाचे नायक अभिजित खांडकेकर, नायिका प्रार्थना बेहरे, निर्माते अतुल कांबळे यांच्यासोबत ‘दिव्य मराठी’ कार्यालयास भेट देऊन मनसोक्त गप्पा मारल्या. ते म्हणाले की, सध्या वाढत चाललेली कंपूशाही मला अस्वस्थ करते. कोणत्याच क्षेत्रात सध्या स्थैर्य नाही. तरुणाई भरकटलेली दिसते. प्रांतवाद वाढत चालला आहे. हे थांबले पाहिजे.
‘जय महाराष्ट्र...’ चित्रपटाबद्दल ते म्हणाले की, जगाच्या कानाकोपर्‍यात पंजाबी, दाक्षिणात्य माणूस सापडतो. मराठी माणूस मात्र दिसत नाही. तुम्ही कुठल्याही देशात गेला तरी तुम्हाला पंजाबी अन्नपदार्थ हमखास मिळतात. त्यामुळेच आम्ही मराठी मुलगा पंजाबात जाऊन व्यवसाय करतो. तेथील एका मुलीचे मन जिंकतो, अशी प्रेमकथा साकारली. चित्रपटांच्या अर्थकारणावरही त्यांनी परखड मते मांडली.