आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्य अनेकांना खुपते : गुप्ते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी रिअँलिटी शोमध्ये चाबूक परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारा, तर कधी अचूक प्रश्न विचारून आपल्या सूत्रसंचालनाचे कसब दाखवणार्‍या, कधी जुन्या गाण्यांना नवसंजीवनी देऊन ते नव्या पिढीसमोर आणणार्‍या संगीतकार अवधूत गुप्तेच्या मागे एक उत्तम दिग्दर्शक दडलेला आहे.
अवधूत, त्याचे चित्रपट आणि काँट्रोव्हर्सी असे समीकरण बनले आहे. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो असे करतो असे सगळ्यांना वाटते. याबाबत त्याला विचारले असता तो म्हणतो, माझे सिनेमे हे सत्य सांगणारे आहेत. सामान्यांच्या रोजच्या जीवनात घडणारे अनुभव आणि घटना मी सिनेमाच्या रूपात मी पडद्यावर मांडतो. सत्य सांगताना अनेकांना वाईट वाटते, ते रुचत नाही. म्हणून विरोध होतो. अशा घटनांमुळे चित्रपटाची चर्चा होते, मात्र त्रासदेखील तेवढाच होतो. अनेक सिनेमागृहांमध्ये चित्रपट लागत नाही. पुन्हा एखादा सिनेमा रिप्रिंट करावा लागतो. सगळे नियोजन बारगळते. अनेकदा आर्थिक फटका बसतो. एवढं सहन करूनही काँट्रोव्हर्सी कोणाला करून घ्यावी वाटते? काही चांगले काम करताना त्रास होतो त्यातलाच हा एक भाग.
आणखी काय म्हणाला अवधुत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...