आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलिनची ‘किक’ साठी ‘टॅपटेशंस टुअर’ ला किक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकलिन फर्नांडिस सध्या सलमान खानसोबत साजिद नाडियाडवालाचा ‘किक’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. बर्‍याच दिवसापासून चित्रपट सृष्टीत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असलेल्या या श्रीलंकाई सुंदरीसाठी हा चित्रपट एक मोठी संधी आहे. परंतु सध्या या चित्रपटामुळे ती द्धिधा परिस्थितीत अडकली होती.
मागील वर्षी तिने बॉलिवूड सेलेब्सच्या ‘टॅपटेशंस टुअर’ साठी होकार दिला होता. जो या वर्षी 15 फेब्रुवारीला मलेशियामध्ये होत आहे. या ‘टॅपटेशंस टुअर’ मध्ये शाहरुख, माधुरी, राणी मुखर्जी, हनी सिंह आणि गायक अरिजित सिंह सहभागी होणार आहेत. परंतु याचदरम्यान साजिद नाडियाडवाला आपल्या चित्रपटाचे शुटिंग या काळात करणार आहेत.
जॅकलिन फर्नांडिसला यातून एकाची निवड करणे आवश्यक होते. अखेर तिने चित्रपटालाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. टुअरचे आयोजक मोहंमद मुरानीनेदेखील जॅकलिनची ही द्विधा अवस्था पाहून तिच्या जागी बिपाशा बसूला घेतले आहे.