Home | Marathi Katta | Star interview -Marathi actor Shashank Ketkar talk about his Drama

'श्री'चे रंगभूमीवर पदार्पण, जाणून घ्या काय म्हणाला आपल्या पहिल्यावहिल्या नाटकाविषयी...

वैशाली करोले | Update - Jul 28, 2014, 09:49 AM IST

'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेद्वारे घराघरांत पोहोचलेल्या श्री अर्थातच अभिनेता शशांक केतकरच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे.

 • Star interview -Marathi actor Shashank Ketkar talk about his Drama
  (फाइल फोटो - अभिनेता शशांक केतकर)
  'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेद्वारे घराघरांत पोहोचलेल्या श्री अर्थातच अभिनेता शशांक केतकरच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. ही बातमी म्हणजे तुमच्या सर्वांचा लाडका श्री आता रंगभूमीचा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. नंदू कदम यांचे सोनल प्रॉडक्शन आणि नाट्यसुमन या संस्थांची निर्मिती असलेल्या 'गोष्ट तशी गमतीची' या नाटकाद्वारे शशांक व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय. या नाटकात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. येत्या 3 ऑगस्ट रोजी हे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे.
  अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकाचा विषय दोन पिढ्यांमधील अंतर हा आहे. एकाच गोष्टीकडे बघण्याचे दोन पिढ्यांचे दोन वेगवेगळे दृष्टीकोन असतात आणि या दृष्टीकोनांमधला फरक दोन पिढ्यांमधलं अतंर वाढवतो. नेमका हाच विषय एकाहून एक विनोदी प्रसंगांच्या चढत्या मांडणीतून या नाटकात दाखवण्यात आला आहे. हीच मुळ संकल्पना असलेली लेखक मिहिर राजदा आणि दिग्दर्शक अद्वैत दादरकने सादर केलेली 'रिश्ता वही सोच नयी' ही हसरी खेळकर पण विचार करायला भाग पाडणारी एकांकिता दोन वर्षांपूर्वी प्रचंड लोकप्रिय ठरली होती. त्याचेच हे विस्तारित नाट्यरुपांतर आहे.
  या नाटकात शशांकसह मुख्य भूमिकेत लोकप्रिय अभिनेते-दिग्दर्शक मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत ही ख-याखु-या आयुष्यातील जोडी पहिल्यांदाच एकत्र रंगभूमीवर येतेय. सामान्य घरातले आई वडील आणि मुलगा यांची कथा नाटकात आहे. बाप मुलगा यांच्या विचारांमधील फरक यातून होणारे वाद आणि मग दुवा होणारी आई अशी कथा या नाटकामध्ये दिसणार आहे.
  याच नाटकाच्या अनुभवांविषयी आम्ही शशांककडून जाणून घेतले. काय म्हणाला शशांक जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...

 • Star interview -Marathi actor Shashank Ketkar talk about his Drama
  ('गोष्ट तशी गमतीची' या नाटकाच्या फोटोशूटमध्ये अभिनेता शशांक केतकर, लीना भागवत आणि मंगेश कदम)
   

  पहिल्या व्यावयासिक नाटकाविषयी काय सांगशील? कसा अनुभव राहिला? 
  - या नाटकाच्या संपूर्ण प्रोसेसचा अनुभव खूप छान राहिला. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेनंतर या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चांगली टीम मला लाभली. लीना भागवत आणि मंगेश कदम यांसारख्या अनुभवी कलाकारांसह काम करण्याची पर्वणी मला मिळाली. अद्वैत दादरकर या तरुण दिग्दर्शकाकडूनसुद्धा बरेच काही शिकायला मिळाले. मालिकेत लीनाताई माझ्या छोट्या आईच्या भूमिकेत आहेत. नाटकातसुद्धा त्या माझ्या आईच्याच भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत पुन्हा काम करणे खूप एन्जॉय केले. प्रत्येक घरात घडणारी ही गंमतीशीर गोष्ट आहे, असं सांगणारं हे नाटक आहे. नाटक बघून प्रेक्षक खूप खूप हसणार आहेत. ते स्वतःला या नाटकाशी रिलेट करु शकतील. प्रेक्षकगृहातून बाहेर पडताना ते समाधानी असतील, हे मी खात्रीपणे सांगू शकतो. या नाटकाची व्यावयासिक गणितं उत्तम जुळून आली आहेत. 
 • Star interview -Marathi actor Shashank Ketkar talk about his Drama
  ('गोष्ट तशी गमतीची' या नाटकाच्या फोटोशूटमध्ये अभिनेता शशांक  केतकर, मंगेश कदम आणि लीना भागवत )
   
   
  यापूर्वीही तुला नाटकांच्या ऑफर्स आल्या होत्या का ? याच नाटकाची निवड का केली ?
  - हो पूर्वीही अनेकदा ऑफर्स आल्या होत्या. मात्र मी योग्य स्क्रिप्टच्या प्रतिक्षेत होतो. या नाटाकामुळे माझी प्रतिक्षा संपली. या नाटकाची कथा उत्कृष्ट आहे. या नाटकाच्या माध्यमातून स्वतःला एक कलाकार म्हणून मी सिद्ध करु शकतो, असं मला वाटतं. पुन्हा एकदा सर्वोत्तम टीमसोबत काम कऱण्याची संधी मिळाली. त्यामुळे एवढ्या चांगल्या टीमसह काम करण्याची संधी मला गमवायची नव्हती.      
 • Star interview -Marathi actor Shashank Ketkar talk about his Drama
  ('गोष्ट तशी गमतीची' या नाटकाच्या फोटोशूटमध्ये अभिनेता शशांक केतकर आणि लीना भागवत)
   
   नाटकाच्या रिहर्सल्स आणि डेलीसोपचे शूटिंग सांभाळताना दमछाक उडते का? 
  - (हसून) हो चांगलीच उडते आहे. रिहर्सल्स आणि शूटिंग सांभाळताना फावल्या वेळेत गाडीतच झोप काढतो. एक गाजत असलेली मालिका करत असताना नाटकही करणं ही तशी तारेवरची कसरत आहे. काम करत असताना घरच्या प्रायोरिटीज आहेत, हे विसरुन चालत नाही. मात्र मी माझ्या मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसचे आभार मानतो. त्यांनी मला सांभाळून घेतले. घरच्यांनीही पाठिंबा दिल्यामुळे माझ्यासाठी काम करणे सोपे झाले.
 • Star interview -Marathi actor Shashank Ketkar talk about his Drama
  ('गोष्ट तशी गमतीची' या नाटकाच्या फोटोशूटमध्ये अभिनेता शशांक केतकर, लीना भागवत आणि मंगेश कदम)
   
  रंगभूमीवरील हे तुझे कमबॅक म्हणता येईल का?
  - नाही मी याला कमबॅक म्हणणार नाही. पूर्वीही मी रंगभूमीवर काम केले हे खरे आहे. पण हे माझे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. त्यामुळे याला मी रंगभूमीवरचे माझे पहिले पाऊल समजतो. रंगभूमीवर वावरताना माझ्याकडून काही चुका होणार नाही, याची मला खात्री आहे, पण काही चुका झाल्यास मायबाप प्रेक्षकांनी त्या पोटात घ्याव्या. 
 • Star interview -Marathi actor Shashank Ketkar talk about his Drama
  (फाइल फोटो -शशांक केतकर)
   
  दडपण येतंय?
  - नाही, मुळीच नाही. 
 • Star interview -Marathi actor Shashank Ketkar talk about his Drama
  (फाइल फोटो -शशांक केतकर)
   
  प्रेक्षकांना काय सांगशील?
  - प्रेक्षकांनी कुटुंबासह येऊन या नाटकाची मजा घ्यावी. मालिकेला तुम्ही जेवढे प्रेम दिले, तेवढेच प्रेम तुम्ही या नाटकालाही द्याल अशी आशा बाळगतो. श्रीच्या भूमिकेला छेद देणारी ही भूमिका आहे. मात्र ही भूमिका व्हिलन किंवा ग्रे शेडची मुळीच नाहीये. नाटकातील माझे पात्र श्रीपेक्षा कमी वयाचे आहे. नुकतेच त्याचे कॉलेज शिक्षण संपले आहे. अगदी सर्वसामान्य घरातील हा मुलगा प्रेक्षकांना आपलासा करेल, असे मला वाटतं. 
 • Star interview -Marathi actor Shashank Ketkar talk about his Drama
  (फाइल फोटो -शशांक केतकर)
   
  फिटनेससाठी काय वेगळी मेहनत घेतो?
  - कामाच्या व्यापामुळे जीमला जाणे होत नाही. त्यामुळे डाएटवरच विशेष भर देतो. स्वतःला पॉझिटिव्ह ठेवतो, नकारात्मक गोष्टींचा कामावर परिणाम होणार नाही, याकडे लक्ष देतो.     
   

Trending