आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'रमेच्या नजरेतून उलगडत जाणार चित्रपटातील अस्सल मराठी प्रेमकथा\' - मृणाल कुलकर्णी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येत्या 8 ऑगस्टला सेव्हेन्टी एमएमवर एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा मराठी चित्रपट दाखल होणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'रमा-माधव'. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणारी मृणाल कुलकर्णींचा दिग्दर्शिका म्हणून हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी यांनी divyamarathi.comशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या वेळी चित्रपटनिर्मिती व दिग्दर्शनातील अनेक अनुभव त्यांनी मनमोकळेपणे शेअर केले. रमा-माधव ही अस्सल मराठी प्रेमकथा आहे. एक दिग्दर्शिका व पटकथालेखिका म्हणून त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत..
''तरुणाईला ऐतिहासिक वास्तविकता व घटनाक्रम अत्यंत सोप्या पद्धतीने सांगण्याचा माझा 'रमा-माधव' हा छोटासा प्रयत्न. 'स्वामी' या गाजलेल्या मराठी मालिकेत माधवराव पेशव्यांच्या पत्नीची भूमिका मी साकारली होती. तेव्हापासूनच ही ऐतिहासिक मराठी प्रेमकथा मोठय़ा पडद्यावर आणायचे माझ्या मनात होते. या मालिकेपासूनच माझ्या करिअरचीही सुरुवात झाली. महाराष्ट्रातल्या तरुणांना इतिहासाची ओढ वाटावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न मी पटकथेवर काम करताना केला आहे.
माधवरावांच्या कालखंडाला रमाबाईच्या नजरेतून पाहण्याचा प्रयत्न चित्रपटात केला आहे. पेशवाईतील नातेसंबंध, राजकारण व समाजजीवनाचे चित्रण यात आहे. शेक्सपियरच्या शोकांतिकेसारखेच मला माधवरावांचे आयुष्य वाटते. वयाच्या 16 व्या वर्षी राज्यकारभाराची जबाबदारी व राज्यकर्ता म्हणून पंचविशीत यश मिळत असतानाच राजयक्ष्माच्या असाध्य रोगाने मृत्यू त्यांच्यासमोर उभा ठाकला.
हे कोणत्याही मोठ्या शोकांतिकेसारखेच आयुष्य होते. रमा-माधव यांच्यातील पती-पत्नीचे नाते सर्मपणाची चरमसीमा असल्याचे इतिहासाच्या पानोपानी जाणवते. राघोबा-आनंदी, गोपिका-नानासाहेब, सदाशिवराव-पार्वती या तिन्ही दांपत्यांच्या जीवनप्रवासाच्या पार्श्वभूमीवर रमा-माधव नाते चित्रित केले आहे. त्यामुळे नातेसंबंध व व्यक्तिरेखांच्या पार्श्वभूमीवर घडलेला इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी प्रेमकथांमध्ये रमा-माधवची प्रेमकथा अजरामर आहे. माधवरावांनी दुसर्‍या लग्नाला दिलेला नकार हा तत्कालीन राजशिष्टाचारांच्या विरुद्ध असला तरी त्यांच्या उभय नात्यातील सर्मपणालाच अधोरेखित करणारा आहे.''
आणखी काय म्हणाल्या मृणाल कुलकर्णी जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...
(शब्दांकन : तृप्ती डिग्गीकर)