आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे अप्रतिम अशी हिऱ्यांची खाण\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : मराठी चित्रपटसृष्टी, साहित्य, संवाद, संगीत म्हणजे अप्रतिम अशी हिऱ्यांची खाण आहे. येथे सबळ गुंतवणूकदारांची सदैव कमतरता असल्याने ही सृष्टी आर्थिक गर्तेत राहिली आणि तिचा म्हणावा तसा विकास होवू शकलेला नाही, अशी खंत व्यक्त करीत मराठी चित्रपटांचे भरभरून कौतुक करीत मराठी चित्रपटांना मिळणाऱ्या शासनाच्या अनुदान योजनेचे अभिनेता मुरली शर्मा याने कौतुक केले.
शक्ती, सनम तेरी कसम, मै हुं ना, मंगल पांडे, धमाल, ढोल, गोलमाल, 13 बी, दबंग, सिंघम अशा 60हून अधिक चित्रपटांत काम केलेला मुरली शर्मा येथे 'मछली जल की राणी है' या आपल्या 13 जूनला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्याच्यासमवेत निर्माता अभिनव जैन, अभिनेता हेमंत पांडे, अभिनेत्री रितू दुधानी, दिग्दर्शक देबलोय डेसुद्धा हजर होते.
मुरली शर्मा यावेळी म्हणाला, मराठी चित्रपट निर्मितीसाठी 2 कोटींच्या पुढे कुणी पैसा लावत नाही, येथे मोठी गुंतवणूक करणारे म्हणजे 7 ते 8 कोटी लावणारे निर्माते मिळाले तर ही कलाकृती झळाळून निघेल. मराठी चित्रपटसृष्टीत तसा मी 5 वर्षांपूर्वीच प्रवेश केला. गजेंद्र आहिरे या दिग्दर्शकाने मला ही संधी दिली. 'एका शब्दात सांगतो ' या त्यांच्या चित्रपटात मी किरण करमरकर सोबत काम केले आहे. त्यानंतर हॅलो जयहिंद, अजिंठा, विजय असो, या मराठी चित्रपटात मी भूमिका केल्या. आता मकरंद देशपांडे दिग्दर्शित 'सॅटरडे-संडे' या आगामी मराठी चित्रपटात मी काम केले आहे. श्रेयस तळपदे निर्माता असलेल्या 'पोस्टर बॉईज' मध्ये मी पाहुणा कलाकार आहेच. हिंदी मराठी इंग्रजी, तमिळ, तेलगु, मल्याळी, गुजराती अशा अनेक भाषा मला अवगत असल्याने 4 तमिळ, 10 तेलगु आणि एका मल्याळी चित्रपटात कामे केली. माझे वडील उत्तरप्रदेशचे आणि आई आंध्रप्रदेशची असल्यानेच बहुधा एवढ्या भाषांवर माझी कमांड राहिली.

'सिंघम 2' बोलताना मुरली शर्मा म्हणाला, रोहित शेट्टी यांच्याशी माझे चांगले ट्यूनिंग आहे, त्यांच्या असंख्य चित्रपटातून मी भूमिका केल्यात पण 'सिंघम 2'मध्ये मी नाही, याची मनाला रुखरुख लागून आहे.
'मछली जल कि राणी है' हा चित्रपट हॉरर चित्रपटांच्या तुलनेत वेगळी अनुभूती देईल असा विश्वास मुरली शर्माने व्यक्त केला आहे.
पुढे पाहा पत्रकार परिषदेत क्लिक झालेली छायाचित्रे...