आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Star Interview Of Bollywood Actress Deepika Padukone

दीपिका म्हणते, पडद्यावर लक नव्हे, तर काम बोलते..

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीपिका पदुकोनला बॅडमिंटनमध्ये नाव कमावयचे होते, पण आज ती अभिनेत्रींच्या ए-लिस्टमध्ये सामील झाली आहे. इथपर्यंत ती दैवाने नव्हे, तर कठोर परिश्रमामुळे आल्याचे सांगते.
इंडस्ट्रीत दीपिका पदुकोनला अति आत्मविश्वासू समजले जाते. 'ओम शांती ओम'मधून पदार्पण करणारी दीपिका सुरुवातीपासूनच कॉन्फिडंट आहे. याविषयी दीपिका म्हणते, मला लोक कॉन्फिडंट म्हणतात हे खरंच आहे, पण मला सुरुवातीपासूनच स्वत:वर विश्वास होता. त्यामुळे मी बॉलीवूडची वाट धरली होती. या आत्मविश्वासामुळेच मी इंडस्ट्रीत 3 वर्षे चांगल्या प्रकारे काम करू शकले आणि येथे मला खूप काही शिकायला मिळाले.
या वर्षीच्या सुरुवातीपासूनच दीपिका एकही ब्रेक न घेता काम करत आहे. अलीकडेच तिने 'रेस 2' चित्रपटाचे चित्रीकरण संपवले आहे. आता ती 'कॉकटेल' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे. या चित्रपटात सैफ अली खान तिचा हीरो आहे. चित्रपटात दीपिकाने बोल्ड भूमिका साकारली आहे. आतापासूनच या चित्रपटासाठी प्रशंसा मिळत आहे. दीपिकाला लहानपणापासून बॅडमिंटन खेळायचा छंद होता. तिला या खेळातच करिअर करायचे होते, पण तिने बॉलीवूडमध्ये भाग्य अजमावले आणि आता ती टॉप अभिनेत्रीत सामील झाली आहे. 26 वर्षांच्या वयात तिने खूप प्रसिद्धी मिळवली आहे. चित्रपटाविषयी ती म्हणते की, इंडस्ट्रीत येण्याचे मी कधीही स्वप्न पाहिले नव्हते. पण आज जे मिळवले ते दैवाने नाही तर माझ्या परिश्रमाने साध्य झाले आहे. इंडस्ट्रीतल्या सर्वच मोठ्या नायकांबरोबर काम केल्याचा मला अभिमान आहे. दीपिका आपल्या करिअरमुळे खूप खुश आहे, पण तिला आपल्या कुटुंबाची आठवण येत असते.
PICS: 'कॉकटेल' पार्टीत बॅकलेस ड्रेसमध्ये पोहोचली दीपिका
PHOTOS : दीपिका, प्रियंकाला मागे टाकत कतरिना ठरली नंबर वन
'हट्टी' दीपिका पदुकोण...
NEW ENTRY: ही हॉट युवती करणार दीपिका पदुकोणची सुटी !