आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द डर्टी पिक्चर'नंतर अभिनेत्री विद्या बालन तिच्या चाहत्यांना 'कहानी' सांगण्यासाठी सज्ज झाली आहे. म्हणजेच विद्याचा 'कहानी' सिनेमा रिलीजसाठी रेडी आहे . येत्या ८ मार्चला विद्याची 'कहानी' आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे. याचचं निमित्त साधून विद्याने नुकतीच दैनिक भास्कर डॉट कॉमला भेट दिली आणि आपली 'कहानी' सांगितली. विद्याने सांगितलेल्या 'कहानी'चा खास भाग तुमच्यासाठी...
विद्या 'कहानी'मध्ये नेमकं आहे तरी काय?
विद्या - या सिनेमात मी प्रेग्नंट वुमनच्या रुपात तुम्हाला दिसणार आहे. बेपत्ता पतीचा शोध घेणा-या प्रेग्नंट वुमनची भूमिका मी या सिनेमात साकारली आहे. प्रेग्नंसीच्या अवस्थेत नव-याचा शोध घेण्यात मला किती अडचणींना सामोरे जावं लागतं, मला माझ्या नव-याचा शोध लागतो का, हे सगळं सांगणारी माझी 'कहानी' आहे. या सिनेमाचं पूर्ण शुटींग कोलकत्याला झालं आहे.
या भूमिकेसाठी तू तुझ्या मोठ्या बहिणीकडून काही टीप्स घेतल्या असं ऐकिवात आहे ?
विद्या - नाही, खरं तर मी शुटींग संपवून घरी आल्यानंतर मला माझ्या बहिणीची गुड न्यूज समजली. त्यानंतर मीच तिला ( हसून) टीप्स द्यायला सुरुवात केली.
द डर्टी पिक्चरमध्ये 'एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट एन्टरटेन्मेंट' होतं, 'कहानी'मध्ये काय आहे ?
विद्या - कहानीमध्ये 'ट्विस्ट ट्विस्ट आणि ट्विस्ट' आहे. सिनेमात अशा काही अनपेक्षित घटना घडतात की त्या नक्की प्रेक्षकांना खिळवून ठेवतील असा मला विश्वास वाटतो.
आत्तापर्यंतच्या कारकिर्दीतला तुझ्यासाठी मोस्ट चॅलेंजिंग ठरलेला रोल कोणता ?
विद्या - 'द डर्टी पिक्चर'मध्ये साकारलेली भूमिका खूपच आव्हानात्मक होती. कारण मी सिल्क स्मितासारखी नाही, किंवा सिल्कसुद्धा माझ्यासारखी नव्हती, त्यामुळे एवढी बोल्ड भूमिका मी करु शकेल का यावर विश्वास बसत नव्हता, मात्र मी ते आव्हान स्विकारलं. आता तुम्ही पाहत आहात सिनेमाला प्रेक्षकांनी कसा प्रतिसाद दिला ते.
एक्स्ट्रा मॅरिटिअल अफेअर्सवर आधारित सिनेमात काम करण्याची तू इच्छा व्यक्त केली आहेस, हे खरं आहे का ?
विद्या - हो मला अशा सिनेमात काम करायला आवडेल. पण का ते मी नाही सांगू शकत.
'फेरारी की सवारी'मध्ये तू लावणीवर थिरकतांना दिसत आहेस, कसा होता लावणीवर थिरकतांनाचा अनूभव ?
विद्या - मला मराठीतला लावणी प्रकार खूप आवडतो. मी लावणी करण्याची इच्छा एका मराठी दिग्दर्शकाकडे व्यक्त केली होती. मला काही दिवसांमध्येच ऑफरसुद्धा आली, मात्र तेव्हा मी कहानीच्या शुटींगमध्ये बिझी होती, त्यामुळे मी ती संधी गमावली. मात्र जेव्हा विधू विनोद चोप्राने मला या आयटम नंबरसाठी विचारलं आणि मला कळलं की या आयटम नंबरमध्ये लावणीवर थिरकता येणार आहे, तेव्हा मी त्यांना लगेचच होकार कळवला. लावणी खूपच मस्त झाली आहे.
कहानीमधला कोणता सीन तुझ्या आवडीचा आहे ?
विद्या - एकच सीन नाही तर या सिनेमाचा संपूर्ण क्लायमॅक्स माझ्या आवडीचा आहे.
'इश्किया टू'मध्ये तुझ्याऐवजी माधुरी दीक्षितची निवड करण्यात आली, त्याबद्दल नाराजी आहे का ?
विद्या - मुळीच नाही, इश्किया सिनेमाने मला भरपूर काही दिलं. आता इश्कियाच्या सिक्वेलची मागणीच दुसरी अभिनेत्री आहे.
तुषार कपूरने केली विद्या बालनला शिवीगाळ
गर्भवती महिलांसाठी विद्या बालन ठरतेय आदर्श
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.