आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूनगंड घालवायला लागली चौदा वर्षे, सिद्धार्थ जाधवची प्रांजळ कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाहेर निघालेले दात, अजब केशरचना यांचा तसेच पिळदार शरीरयष्टी नसल्याचा न्यूनगंड माझ्यात होता. मराठी सिनेमाचा हिरो म्हणून उदयाला येईल, असं कधीच वाटलं नव्हतं. सिनेमात काम मिळालं तर हिरोच्या मागे कुठेतरी उभा असेल आणि केवळ एक-दोन डॉयलॉग बोलेल, असंच मला नेहमी वाटायचं, परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. हा न्यूनगंड घालवायला मला एक-दोन नाही, तर तब्बल चौदा वर्षे लागली, अशी प्रांजळ कबुली प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव याने दिली.
एका कार्यक्रमाच्या प्रचारासाठी नागपुरात आला असता सिद्धार्थने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी दिलखुलास गप्पा मारल्या. तो म्हणाला, अतिशय सामान्य परिवारातील आणि एकांकिका स्पर्धांमधून या क्षेत्रात आलो आहे. पूर्वी काम करताना माझ्या शरीरयष्टीबद्दल माझ्यात बराच न्यूनगंड होता. हा न्यूनगंड घालवायला मला चौदा वर्षे लागली. या चौदा वर्षांत माझ्या आयुष्यात अनेक नकारात्मक गोष्टी घडल्या, परंतु त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीनेच बघत गेलो.
पुढे काय म्हणाला सिद्धार्थ जाणून घेण्यासा ठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...