आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B’day: ‘स्टाइल’द्वारे केले पदार्पण, स्टार किड असूनही फ्लॉप ठरली ही अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रिया सेन)

बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन आज आपला 34 वा (24 जानेवारी1981) वाढदिवस साजरा करत आहे. रिया फिल्मी फॅमिलीतून आहे. तिची आजी (आईची आई) सुचित्रा सेन बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्री होत्या. रियाची आई मुनमुन सेन आणि बहीण रायमा सेन यासुद्धा बॉलिवूड अभिनेत्री आहेत.
म्युझिक व्हिडिओ आणि मॉडेलिंगमधून मिळाली ओळख...
फाल्गुनी पाठकच्या अल्बममधून रियाला ओळख प्राप्त झाली. तिच्यावर चित्रीत झालेले याद पिया की आने लगी... हे गाणे जबरदस्त हिट ठरले बोते. त्यानंतर तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. बराच काळ तिने मॉडेलिंगसुद्धा केले आहे.
बालकलाकार म्हणून केले आहे काम...
रियाने 1991 मध्ये रिलीज झालेल्या 'विषकन्या' या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले होते. पूजा बेदीचे बालपणीचे पात्र तिने साकारले होते. 2001मध्ये 'स्टाइल' या सिनेमाद्वारे तिने डेब्यू केले. या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. पहिला यशस्वी सिनेमा आणि फिल्मी बॅकग्राउंड असूनदेखील रिया बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरली.
प्रमुख सिनेमेः ताजमहल (1999, तमिल), स्टाइल (2001), कयामत (2003), झंकार बीट्स (2003), शादी नं. 1 (2005), अपना सपना मनी मनी (2006), लव खिचडी (2008). हिंदीसोबतच रियाने तेलगू, बंगाली आणि उडिया सिनेमात काम केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रिया सेनची फेसबुक अकाउंटवरुन घेण्यात आलेली निवडक छायाचित्रे...