आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदाच्या मुलीसह पदार्पणासाठी सज्ज आहेत हे 5 स्टार किड्स, पाहा कोण आहेत?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
51 वर्षांचा झालेल्या गोविंदाने कमबॅक केले आहे. गोविंदाची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. परंतु आता त्याचे चाहते मुलगी नर्मदाच्या एंट्रीची प्रतिक्षा करत आहेत. मागील काही वर्षांपासून त्याची मुलगी नर्मदा सिनेमा येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सांगितले जाते, की नर्मदाने आपल्या पदार्पणाच्या सिनेमाला सुरुवात केली आहे.
नर्मदाच्या एंट्रीविषयी गोविंदाने सांगितले होते, की त्याची मुलगी एखादी चांगली पटकथा मिळाल्यानंतरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. गोविंदाच्या सांगण्यानुसार, नर्मदाने मागील 3 वर्षांमध्ये जवळपास 30 सिनेमे रिजेक्ट केले आहेत. मात्र, लवकरच नर्मदा पंजाबी दिग्दर्शक समीप कांगच्या 'सेकंड हँड हसबँड'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात पंजाबी अभिनेता गिप्पी ग्रेवाल तिच्या अपोझिट आहे.
गोविंदासोबतचे काही अभिनेते आजदेखील इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत आणि काही लाइमलाइटपासून दूर आहेत. त्यांची मुलेदेखील बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यास तयार आहेत. त्यामध्ये अनिल कपूर आणि सुनील शेट्टी यांच्या मुली सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही स्टार्स किड्सविषयी जे सिनेमांत एंट्री करत आहेत...