आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता दीदींसह या स्टार्सच्या निधनाचे खोटे वृ्त्त पसरले होते वा-यासारखे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभर पसरलेल्या इंटरनेटच्या जाळ्याने जग खूप जवळ आले आहे. सोशल नेटवर्किंग साईट्वर पसरणा-या अफवांची संख्या कमी नाहीये. मग ती एखाद्याच्या लग्नासंदर्भातील असो, ब्रेकअपबद्दलची असो किंवा चक्क एखाद्याच्या मृत्यूसंदर्भातील. सोशल नेटवर्किंग साईटवर अशा प्रकारच्या अफवा पसरणे हे आता नित्यनेमाचेच झाले आहे. हं पण ही अफवा जर सेलिब्रिटींच्या मृत्यूसंदर्भातील असली तर मग विचारायला नको. कित्येकदा सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रसिद्ध सेलिब्रिटीचा मृत्यू झाला, असे ट्विट केल्या जाते आणि मग चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जाते.
अलीकडेच गानकोकिळा लता मंगशेकर यांच्या निधनाची धक्कादायक बातमी सर्वत्र पसरली. 25 मार्च रोजी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाचे खोटे वृत्त सगळीकडे वा-यासारखे पसरले. स्वतः लतादीदींनी या अफवांना पूर्णविराम दिला. मी अगदी ठणठणीत असल्याचे दीदींनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले. मी माझ्या निधनाचे वृत्त ऐकून हैराण झाले, असेही लता दीदींनी म्हटले आहे.
लता दीदींनी ट्विट केले, नमस्कार मेरी तबियत के बारे में अफवाहें फैल रही हैं, पर आप सबका प्यार और दुआएं मेरे साथ हैं। मेरी तबियत बिल्कुल ठीक और और मैं स्वस्थ हूं।
काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाची बातमी पसरली होती. कादर खान यांच्याप्रमाणेच बिग बी अमिताभ बच्चन यांच्याही निधनाची बातमी सोशल नेटवर्किंग साईटवर पसरली होती. या बातमीमुळे बच्चन कुटुंबियांना मनःस्ताप सहन करावा लागला होता.
एक नजर टाकुया अशा काही सेलिब्रिटींवर ज्यांच्या मृत्यूची अफवा सोशल नेटवर्किंग साईट्सवर वा-यासारख्या पसरली होती. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कोणकोणत्या सेलिब्रिटींच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरली होती.