आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरोंच्या या चित्र-विचित्र नावांनी प्रेक्षकांना हसवले पोटधरून, जाणून घ्या Funny नावांविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान आणि अनिल कपूर)
मुंबई: सलमानच्या 'किक'ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. सिनेमाने भारतात आतापर्यंत 198 कोटींचा व्यवसाय केला आहे. तसेच वर्ल्डवाइड बिझनेस 300 कोटींपेक्षा जास्त झाला आहे.
'किक'मधील अनेक फॅक्टर पहिल्यांदाच सलमानच्या कोणत्या सिनेमात झाले आहेत. या सिनेमामधून साजिद नाडियाडवालाने दिग्दर्शनास सुरुवात केली आहे. तसेच, सलमान सिनेमातील एका गाण्याचा पार्श्वगायक झाला आहे. सिनेमात बरेच नवीन प्रयोग करण्यात आले, जे यशस्वीही झालेत. या प्रयोगामध्ये सलमानचेसुध्दा नाव सामील आहे.
'किक'मध्ये सलमानचे नाव देवीलाल
सलमानचे सिनेमात देवीलाल नाव आहे. प्रेम या नावाने प्रसिध्द सलमानचे पहिल्यांदा इतके जूने नाव या सिनेमात ठेवण्यात आले. रोजच्या आयुष्यात आपण हजारदा ऐकतो असे सिनेमातील हीरोचे नाव असते. परंतु या सिनेमात सलमानचे देवीलाल हे नाव ऐकून त्याचे चाहते थोडे शॉक झालेत.
'किक' पाहिलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी सलमानचे हे नाव थोडे फनी टाइप होते. कदाचित सलमानचे त्यामागे असाच काहीतरी उद्देश असावा. हे त्याचे त्यालाच ठाऊक. मात्र, बॉलिवूड सिनेमांत हीरोचे फनी नाव असण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्यांच्या नावांनी लोकांना हसायला भाग पाडले आहे. त्यामध्ये बिग बींपासून मिस्टर परफेक्शनिस्टपर्यंत अनेक अभिनेत्यांचा सामावेश आहे. प्रसिध्द स्टार्सच्या सिनेमातील या नावाने प्रेक्षकांचे बरेच मनोरंजन झाले हे मात्र नक्की.
आमचे हे स्पेशल पॅकेज बॉलिवूडच्या हीरोंच्या चित्र-विचित्र नावांविषयी आहे. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या सिनेमात कोणत्या हीरोचे कोणते गंमतीशीर नाव होते?...