आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्‍यूशी साधलेला संवाद: 'स्‍टेईंग अलाईव्‍ह'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कथा: सुजित सेन या बंगाली लेखकाच्‍या सत्‍यकथेवर आधारित 'स्‍टेईंग अलाईव्‍ह' हा चित्रपट -हदयविकाराच्‍या झटक्‍यामुळे आयसीयूत दाखल झालेल्‍या दोन रूग्‍णांभोवती फिरते. त्‍यांच्‍यातील आदित्‍य रॉय (अनंत महादेवन) पत्रकार असून त्‍याला याआधी दोन वेळा -हदयविकाराचे झटके आलेले आहेत. शौकर अली (सौरभ शुक्‍ला) गँगस्‍टर असतो. या दोघांचीही प्रकृती गंभीर असते. शौकरची बायको शेरेन अली (नवनी परिहार) आणि मुलगा अल्‍ताफ (चंदन रॉय सान्‍याल) तसेच, आदित्‍यची बायको (सुनीता) दोघांचा जीव वाचावा यासाठी प्रार्थना करत असतात. आयुष्‍यात घडलेले किस्‍से, चुका, आयुष्‍याकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन, कुटुंबाची चिंता, इत्‍यादी अनेक गोष्‍टींवर हे दोघेही एकमेकांशी गप्‍पा मारत असतात. त्‍यांच्‍या या संवादांवरच संपूर्ण चित्रपट घडतो.
मांडणी: चित्रपटातून प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा आयुष्‍याकडे बघण्‍याचा दृष्‍टीकोन किती वेगवेगळा असतो यावर भाष्‍य करण्‍यात आले आहे. काही काळाने आपण या जगात नसणार या कल्‍पनेनेच माणसाच्‍या मनात नानाविध विचार येत असतात. आयुष्‍याच्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यावर असताना एखाद्यासमोर आपले मन मोकळे करण्‍याची संधी चित्रपटातील मध्‍यवर्ती पात्रांना मिळते. त्‍या दोघांमधील संवाद हाच चित्रपटाचा मध्‍यबिंदू आहे. चित्रपटातील संवाद चांगले व अर्थपूर्ण आहेत. परंतु, काहीवेळा पटकथा ताण्‍ाली गेली आहे असे वाटते.
स्‍टार कास्‍ट: अनंत महादेवन आणि सौरभ शुक्‍ला दोघेही बॉलिवूडमधील उत्‍कृष्‍ट अभिनेत्‍यांमध्‍ये मोडतात. त्‍यामुळे दोघांच्‍याही अभिनयाची, संवादशैलीची जुगलबंदी अनुभवण्‍याची संधी या चित्रपटामुळे मिळाली आहे. काही प्रसंगांमध्‍ये सौरभ शुक्‍ला अनंत महादेवन यांच्‍या वरचढ ठरतात. नवनी परिहार आणि सुनीता यांनीही चांगला अभिनय केला आहे. चंदन रॉय सान्‍यालनेही त्‍याची भूमिका चांगली निभावली आहे.
दिग्‍दर्शन: अनंत महादेवन यांनी आतापर्यंत दिग्‍दर्शित केलेले चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर जोरदार आपटले आहेत. पण, 'स्‍टेईंग अलाईव्‍ह'मधील संवेदनशील विषय हाताळताना दिग्‍दर्शकाने केलेला अभ्‍यास दिसून येतो. सगळ्या बाजूंनी विचार करून, विषयाचे कंगोरे लक्षात घेऊन चित्रपट बनवण्‍यात दिग्‍दर्शक यशस्‍वी झाला आहे. पण, पटकथा कंटाळवाणी असल्‍याने त्‍याचा चित्रपटावर नकारात्‍मक परिणाम होऊ शकतो.
तांत्रिक बाजू: चित्रपटाचे पार्श्‍वसंगीत उत्‍तम आहे. सिनेमॅटोग्राफी सामान्‍य आहे. त्‍यात कसलेच नाविन्‍य नाही. चित्रपटातील संवाद चांगले असणे ही चित्रपटाची खरी गरज होती. त्‍यानुसार, संवादलेखन उत्‍कृष्‍ट झाले आहे. संवादांमधील निरर्थकता टाळण्‍याचा पूर्ण प्रयत्‍न झाला आहे. परंतु, पटकथेवर व एडिटिंगवर अधिक मेहनत घेण्‍याची गरज आहे.
का पाहावा: उत्‍तम अभिनय, कथा, मांडणी, संगीत यामुळे चित्रपट बघण्‍यास हरकत नाही. पण, पटकथा, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग याबाबतीत निराशा होईल.