मुंबई: बॉलिवूडमध्ये स्थापित होण्यासाठी संघर्ष करणारी अभिनेत्री सय्याम खन्ना अर्थातच मोना खन्नाने यारी रोड परिसरात राहत्या फ्लॅटमध्ये पंख्याला गळफास घेतला आहे. अशी माहिती तिची बहीण रियाने पोलिसांना दिली आहे.
बातम्यांनुसार, 28 वर्षीय सय्यामने 'द हॉन्टेड हाउस' सिनेमात काम केले होते. तिचा 'द लास्ट हॉरर' सिनेमा रिलीज होणार आहे. पोलिसांच्या सांगण्याप्रमाणे, 'घटनेच्या एका दिवसापूर्वी (30 ऑगस्ट) सय्यामने तिची बहीण रियाला मार्केटमध्ये पाठवले होते. रिया मार्केटमध्ये जाण्यापूर्वी सय्यामने तिला अलिंगन देऊन म्हणाली होती, मी तुझ्यावर खूप प्रेम आहे. मार्केटमधून परतल्यानंतर मला न जागवता जेवण करू झोपण्यास तिने रियाला सांगितले. रिया मार्केटमधून परतल्यानंतर रात्री उशीरापर्यंत टीव्ही पाहत होती. त्यावेळी तिने सय्यामच्या खोलीतून गाण्याचा आवाज ऐकला. तिला वाटले, की ती गाणे ऐकत-ऐकत झोपली असावी. मात्र तिने बहीणीच्या खोलीत जाऊन पाहिल्यानंतर तिला सय्यामाचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. त्यानंतर रियाने पोलिसांत कळवले.'
पोलिसांनी सांगितले सय्यामने एक सुसाइड नोट मागे सोडली आहे. तिने आत्महत्यासाठी कुणालाच दोषी ठरवलेला नाहीये. कुणाला विचारपूस न करण्यास सांगितले आहे. मात्र तिच्या बहीणीच्या सांगण्याप्रमाणे, 'तिच्या आत्महत्येमागे तिचा बॉयफ्रेंड असू शकतो. बहीण रियाने पुढे सय्यामचा बॉयफ्रेंड एका प्रसिध्द अभिनेत्याचा मुलगा आहे. त्याने अनेकदा माझ्या बहीणीला मारहाण केली आहे. तो तिला दुर्लक्षित करत असल्याने ती गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी ती त्या दिवशी संध्याकाळी त्याला भेटण्यासाठी गेली होती. ती घरी आल्यानंतर खूप उदास दिसून आली.'
रियाने सय्यामच्या बॉयफ्रेंड विरोधात तक्रार दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्याची पार्श्वभूमी बळकट असल्याने ती तिच्या बहीणीला न्याय देऊ शकत नसल्याचेही रियाने सांगितले.