आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा स्टार्सच्या स्टाइलिश मुलींना, ग्लॅमरस अभिनेत्रींना देतात टक्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये सध्या काही स्टार्सचे मुल फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री करण्यास सज्ज झाले आहेत. अलीकडेच जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगरने 'हीरोपंती' या सिनेमामधून पदापर्ण करण्याची तयारी केली आहे. या सिनेमाचा ट्रेलर मुंबईमध्ये लाँच करण्यात आला. परंतु या लाँचिंगमध्ये जॅकी यांचा मुलापेक्षा त्यांच्या मुलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जॅकी यांची ग्लॅमरस मुलगी कृष्णा
काळ्या रंगाच्या आउटफिट ड्रेसमध्ये जेव्हा कृष्णा या कार्यक्रमात पोहोचली तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर टिकून होत्या.
हातात मोबाईल, खांद्यावर पर्स आणि डोक्यावर चश्मा या स्टाइलने ती खूपच आकर्षक दिसत होती. कृष्णाने यावेळी भावाला शुभेच्छा दिल्या. सोबतच काही फोटो कॅमे-यात कैद केले.
आमिरची स्टाइलिश मुलगी
जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाचा ग्लॅमरस लूक आहे तर आमिरचची मुलगी इराचा स्टाइलिश लूक दिसतो. माध्यमांपासून दुर राहणारी इरा फॅमिली इवेंटमध्ये नेहमीच दिसते. इरा 4 एप्रिल 2014 रोजी इमरान खानच्या घरी आपली आई रीना आणि भाऊ जुनैदसोबत पोहोचली होती. इमरानच्या घरी पत्नी अवंतिकाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इराचा स्टाइलिश लूक बघायला मिळाला. तिने काळ्या रंगाचा प्रिंटेड शॉर्ट ड्रेस परिधान केलेला होता. 17 वर्षांची इरा आमिरची पहिली पत्नी रीनाची मुलगी आहे.
बॉलिवूडमध्ये स्टार्सच्या मुली नेहमीच चर्चेत विषय बनलेल्या आहेत. स्टार्सना ओळखणारे चाहते त्यांच्या मुलींना ओळखत नाहीत. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या स्टार्सच्या ग्लॅमरस मुलींची ओळक करून देणार आहोत. या पॅकेजमध्ये विनोद मेहराची मुलगी सोनिया, गोविंदाची मुलगी नर्मदा, सैफ अली खानची मुलगी सारा अली खानसह अनेक स्टार्सच्या मुलींची स्टाइलिश छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा बॉलिवूड स्टार्सच्या मुलींचे खास PICS...