आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Picsमध्ये पाहा फॅशन आयकॉन सोनम कपूरने परिधान केलेले Worst ड्रेसेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा फॅशन सेन्स नेहमीच इंडस्ट्रीत चर्चेत विषय असतो. तिला बॉलिवूडची फॅशन दीवा म्हणून संबोधले जाते. सिनेमांपेक्षा ती आपल्या स्टायलिश ड्रेसेसमुळे चर्चेत असते. असे म्हटले जाते, की अभिनेता अनिल कपूरसाठी सोनमच ड्रेसची निवड करत असते.
29 (9 जून 1985) वर्षीय सोनम नेहमीच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते. मात्र अनेकदा सोनमचा वाईट ड्रेसिंग सेन्ससुद्धा तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. आपल्या ड्रेसेसमुळे प्रसिद्धीझोतात राहणारी सोनम अनेकदा वाईट कपड्यांची निवड केल्यामुळे स्टायलिश दिसली नाहीये.
जगातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणा-या सोनमला येथेसुद्धा स्टायलिश आउटफिट्समध्ये बघितले गेले आहे. मात्र गेल्या वर्षी कानच्या रेड कार्पेटवर सोनम नाकात नथ घालून इंडियन लूमध्ये अवतरली होती. तिचा हा लूक कुणाच्याही पसंतीला पडला नव्हता. उलट सोनमवर अशा ड्रेसिंगमुळे टीकाच झाली.
तसं पाहता कानमध्ये सोनमचे ड्रेसेस स्टायलिश असतात आणि अनेकदा तिचे कौतुकसुद्धा केले जाते. फॅशनमध्ये सोनम अनेकदा ऐश्वर्यापेक्षा वरचढ ठरली आहे. मात्र कधीकधी स्टाइल आणि फॅशनच्या नादात सोनमने परिधान केलेल्या ड्रेसमुळे तिच्या ग्लॅमरस लूकला दृष्ट लागली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा स्टायलिश सोनम कपूरने परिधान केलेले सर्वात वाईट ड्रेसेस...