(फाइल फोटो: दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या बहिणीच्या लग्नात करीना कपूर खान रेड डिजाइनर शिफॉन साडीमध्ये)
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानची अलीकडेच लाइट कलरच्या डिझायनर साडीमुळे बरीच चर्चा झाली. झालं असं, की आपल्या आतेभावाच्या 'लेकर हम दिवाना दिल' या पहिल्या सिनेमाच्या म्युझिक लाँचवेळी करीना कपूर ग्लॅमरस अंदाजात अवतरली होती. मात्र यावेळी करीनाने डिझायनर साडीसह परिधान केलेल्या बॅकलेस ब्लाऊजला सेफ्टी पिन लागलेली दिसली. ही साडी करीनाला तिचे पती
सैफ अली खानने गिफ्ट केली होती. डिझायनर सत्या पॉल यांनी ही साडी डिझाइन केली होती. या साडीसह ब्लॅक कलरचे बिकिनी स्टाइल ब्लाऊज करीनाने परिधान केला होता. करीनाने नॉट असलेल्या या ब्लाऊजला सावधगिरी म्हणून सेफ्टी पिन लावली होती.
तसे पाहता अभिनेत्रींनी परिधान केलेले ड्रेसेस नेहमीच चर्चेत असतात. विशेषतः डिझायनर साडी आणि त्यांचे ब्लाऊज. अनेकदा या अभिनेत्री पारंपरिक साडीला ग्लॅमरस लूक देताना दिसतात. पारंपरिक साडीसह अभिनेत्रींनी परिधान केलेले ब्लॅकलेस ब्लाऊज त्यांच्या सौंदर्याला चारचाँद लावतात. त्यामुळे बॉलिवूडमध्ये डिझायनर ब्लॅकलेस ब्लाऊज फॅशन ट्रेंडमध्ये आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अभिनेत्रींनी पारंपरिक साडीला दिलेला ग्लॅमरस लूक...