आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Subhash Ghai And Sunny Deol To Come Together For A Film

मतभेद संपवून एकत्र सिनेमा बनवणार सनी देओल आणि सुभाष घई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुभाष घई यांचा 'कांची' आणि सनी देओलचा 'यमला पगला दीवाना 2' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप झाल्यानंतर दोघेही पुन्हा हिट स्थापित होण्याचा प्रयत्न करत आहेत. मुक्ता आर्ट्सच्या बॅनरखाली आता अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा मसाला असलेला सिनेमा तयार होणार आहे. त्यामध्ये धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल हे त्रिकूट आपल्या अभिनयाची पुन्हा जादू दाखवणार आहेत. परंतु विशेष म्हणजे, हे तिघेही या सिनेमासाठी मानधन घेणार नाहीये. पण नफ्यामध्ये 50 टक्के वाटा ठेवणार आहेत.
बातमी अशी आहे, की नीरज पाठकच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'राइट या राँग' सिनेमावेळी घई आणि सनी 2010मध्येसुध्दा एकत्र आले होते. सिनेमात कोंकणा सेन, इरफान खान आणि ईशा कोप्पीकरनेसुध्दा अभिनय केला होता. सिनेमा मल्टिप्लेक्स प्रेक्षकांसाठी होता. परंतु घई आणि सनी यांच्यामध्ये थोडे मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर मुक्ता आर्ट्सने सिनेमाचे प्रमोशन सनीला जसे हवे होते तसे केले नाही.
त्यामुळे सनीने सिनेमाचे प्रमोशन अर्ध्यातच सोडून दिले. समीक्षकांची प्रशंसा मिळूनदेखील घई यांना सिनेमामध्ये 10 कोटींचा तोटा झाला. त्यानंतर दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. त्यावेळी सनी एक हिट अभिनेता होता. परंतु सनीला आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या सिनेमांसह इतर (सिंह साहब द ग्रेट, ढिश्क्याऊ) आणि सुभाष घई यांना 'कांची'मध्ये मोठे नुकसान झेलावे लागले.
दोघांनी पुन्हा एकदा एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. चार वर्षांपूर्वी एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देओल कुटुंबीय आणि सुभाष घई पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. याचा मध्यस्थी नीरज पाठक आहे.