आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडत्या काळात सुभाष घईंना जुन्या सुपरहिट‌्सचा आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुभाष घई १९९९ पासून एका हिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचा 'कांची'देखील फ्लॉप ठरला. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे झालेले नुकसान जुन्या चित्रपटांच्या माध्यमातून ते भरून काढत आहेत. आता घईंनी 'राम लखन'च्या रिमेकचे अधिकार करण जोहरला १० कोटींत विकले आहेत.
करण जोहर 'राम लखन'चा रिमेक बनवणार असल्याचे आम्ही दोन दिवसांपूर्वीच सांगितले होते. २०१६ मध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे. सुभाष घईंनी १० कोटींमध्ये या जुन्या सुपरहिट चित्रपटाचे रिमेक अधिकार धर्मा प्रॉडक्शन्सला विकले आहेत. मागील (किसना, कांची) चित्रपटातून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना जुन्या चित्रपटांचा आधार मिळाला आहे. त्यांनी आतापर्यंत एकूण ३५ पेक्षा जास्त चित्रपट बनवले आहेत.
१९९९ मध्ये रिलीज झालेला 'ताल' हा त्यांचा शेवटचा हिट चित्रपट होता. त्यानंतर 'यादें', 'किसना', 'युवराज', 'ब्लॅक अँड व्हाइट', 'कांची' हे चित्रपट फ्लॉप ठरले. 'यादें', 'युवराज' आणि 'ब्लॅक अँड व्हाइट' फ्लॉप ठरले असतानाही घईंनी हे चित्रपट दुसऱ्या स्टुडिओला मोठ्या किमतीत विकल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले नाही. यामध्ये वितरकांना मोठा फटका बसला. 'किसना' आणि 'कांची'च्या वितरणाची जबाबदारी घईंनी पार पाडली. या चित्रपटांमुळे त्यांना २५-२५ कोटींचे नुकसान सहन करावे लागले. यातून बाहेर येण्यासाठी त्यांना आता त्यांचेच जुने चित्रपट कामी येत आहेत.
२००८ मध्ये हिमेश रेशमियाने 'कर्ज' (१९८०) चा रिमेक बनवला. या रिमेकचे अधिकार घईंनी कोटींमध्ये विकले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुक्ता आर्टस कंपनीच्या सर्व चित्रपटांचे टीव्ही प्रसारणाचे अधिकार ३८ कोटींमध्ये विकले गेले. घईंच्या चित्रपटांमधील सुपरहिट गाण्यांची रॉयल्टी वर्षामध्ये कमीत कमी एक कोटी रुपये होते. सलमान खानच्या बॅनरद्वारे बनत असलेल्या घईंच्या 'हीरो' चित्रपटाचे रिमेक अधिकार सव्वा कोटीमध्ये विकले गेले होते. सलमानशी असलेल्या घनिष्ठ संबंधांमुळे अत्यंत कमी किमतीत हा व्यवहार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अन्यथा हा व्यवहार पाच कोटींपर्यंत गेला असता. आाता १० कोटींमध्ये विकण्यात आलेल्या 'राम ल‌खनच्या' रिमेकचे अधिकार 'किसना' आणि 'कांची'चे नुकसान भरून काढण्यास मदत करत आहेत.