आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मंगलाष्टक वन्स मोअर'च्या टीमने साजरे केले सिनेमाचे यश, पाहा SUCCESS PARTYचे खास फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मंगलाष्टक वन्स मोअर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गाजतोय. प्रेक्षकांच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे या सिनेमाने हिट सिनेमांच्या यादीत स्वतःचे स्थान निर्माण केले. आपल्या सिनेमाला मिळालेले हे यश साजरे करण्यासाठी सिनेमाची निर्माती रेणू देसाईने एका सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सिनेमाच्या टीमने केक कापून आपला आनंद साजरा केला. विशेष म्हणजे यावेळी निर्माती रेणू देसाई हिचाही वाढदिवस साजरा करण्यात आला.
या सक्सेस पार्टीत अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेत्री कादंबरी कदम, दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, गायक-दिग्दर्शक अवधूत गुप्ते, अभिनेता नागेश भोसले, सुशांत शेलार, निर्माते नानुभाई जयसिंघानी हजर होते. सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणा-या मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर मात्र यावेळी पार्टीत दिसल्या नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये बघा 'मंगलाष्टक वन्स मोअर'च्या टीमचा सेलिब्रेशन मूड...
फोटो साभार - फेसबूक