आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: कलाकार-तंत्रज्ञाच्या सन्मानाने रंगली \'टीपी\'ची सक्सेस पार्टी, सेलिब्रिटींनी केली धमाल-मस्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षाची रोमॅंटीक सुरूवात करत प्रेक्षकांची मने जिंकलेल्या टाइमपास (टीपी) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही अधिराज्य गाजविले. केवळ एका महिन्यात 30 कोटींच्यावर कमाई करत टीपीने मराठी सिनेमाच्या इतिहासातील अनेक विक्रम मोडले आणि अनेक नवे विक्रम रचले. टीपीचं हे अभूतपूर्व यश साजरं करण्यासाठी टीपीच्या टीमच्या वतीने नुकताच जल्लोष साजरा झाला. ज्यामध्ये टीपीच्या यशात सहभागी असणा-या पडद्यावरील आणि पडद्यामागील सर्व कलाकार, तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक रवी जाधव, अथांश कम्युनिकेशन्सच्या मेघना जाधव आणि एस्सेल व्हिजनचे नितीन केणी आणि निखिल साने उपस्थित होते.
'मला वेड लागले प्रेमाचे....' म्हणत टीपीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, गोवा, गुजरातमध्येही प्रदर्शित झालेल्या टीपीने सर्वत्र हाउसफुल्लचे बोर्ड दिमाखात झळकवले. दगडु-प्राजक्ताची ही प्रेमकथा प्रेक्षकांना एवढी भावली की या सिनेमाचे डायलॉग्ज, गाणी, फोटोज्, सोशल नेटवर्क साईट्स आणि व्हॉट्स अॅप सारख्या फोन अॅप्सवरून मोठ्या प्रमाणावर शेअर झाले. सिनेमा ख-या अर्थाने प्रेक्षकांपर्यंत पोचला याची ही पावती होती. पहिल्या 3 आठवड्यात टीपीने 30 कोटी रूपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आणि मागच्या वर्षी ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'दुनियादारी' सिनेमाचा 26 कोटींच्या कमाईचा विक्रम मोडला. विशेष म्हणजे या दोन्ही सिनेमांची प्रस्तुती एस्सेल व्हिजन आणि झी टॉकीजची होती. त्यामुळे या सक्सेस पार्टीला 'दुनियादारी'ची टीमही आवर्जून उपस्थित होती.
यावेळी 'दुनियादारी'चे निर्माते आणि दिग्दर्शक संजय जाधव यांनी टीपीचे दिग्दर्शक रवी जाधव यांचा एक फिरता चषक देऊन सन्मान केला. टीपीने दुनियादारीचा विक्रम मोडला आता पुढे जो सिनेमा टीपीचा विक्रम मोडेल त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाला हा फिरता चषक देऊन त्याचा सन्मान करावा जेणे करुन यातून मराठी निर्माते-दिग्दर्शक यांना प्रेरणा मिळेल असा विचार या फिरत्या चषकामागे असल्याचं संजय जाधव यांनी सांगितलं.
टीपीच्या या सेलिब्रेशन पार्टीमध्ये टीपीच्या डीव्हीडीचेही प्रकाशन करण्यात आले. टीपीची पायरेटेड डीव्हीडी घेऊन सिनेमा बघितल्याने निर्मात्याचं आणि मराठी सिनेसृष्टीचं नुकसान होतं. त्यामुळे ज्यांना डीव्हीडीवर हा चित्रपट बघायचा आहे त्यांनी व्हिडीओ पॅलेसच्या वतीने बाजारात आलेली ही अधिकृत डीव्हीडी घेऊनच बघावा आणि हे नुकसान टाळावे असे मत टीपीचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी व्यक्त केले.
पाचव्या आठवड्यातही टीपी शंभरहून अधिक थिएटरमध्ये सुरू असून त्याची ही घोडदौड पुढील दिवसांतही कायम राहील असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.
या पॅकेजमधून आम्ही टीपीच्या सक्सेस पार्टी कशी रंगली हे खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. या पार्टीत सर्व कलाकारांनी एकच धम्मला उडवून दिली होती. चला तर मग टीपीच्या सक्सेस पार्टीची खास झलक बघण्यासा ठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
फोटो साभार - फेसबूक