आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रेयसने शॅम्पेन उडवून केले \'पोश्टर बॉईज\'च्या यशाचे सेलिब्रेशन, पाहा सेलेब्सचे पार्टी मूडचे PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - अभिनेता-निर्माता श्रेयस तळपदेने आयोजित केलेल्या पार्टीची खास झलक यामध्ये दिसत आहे. )
श्रेयस आणि दीप्ती तळपदे यांची निर्मिती असलेला समीर पाटील दिग्दर्शित 'पोश्टर बॉईज' हा सिनेमा जबरदस्त गाजतोय. या सिनेमाने रिलीजच्या अवघ्या चार दिवसांत एक कोटींचा गल्ला जमवला असून बॉक्स ऑफिसवर त्याची यशस्वी घौडदौड सुरु आहे.
1 ऑगस्टला 167 सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांसह समीक्षकांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे सिनेमाची संपूर्ण टीम भलतीच खूश आहे. आपल्या सिनेमाला मिळालेल्या या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी श्रेयसने अलीकडेच एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत त्याने शॅम्पेन उडवून आपला हा आनंद साजरा केला.
या पार्टीत मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अक्षय कुमार स्टारर 'एन्टरटेन्मेंट' या सिनेमाचे दिग्दर्शक साजिद-फरहाद ही जोडी श्रेयसच्या आनंदात आवर्जुन सहभागी झाली. याशिवाय मराठीतील बरीच कलाकारमंडळी या पार्टीत दिसली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'पोश्टर बॉईज'च्या सक्सेस बॅशची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा कलाकाराची पार्टी मूडची खास झलक...