आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sumeet Raghavan All Set To Make His Debut In Atul Kale’s ‘Sandook’

‘संदूक’मधून सुमीत राघवनची मराठी सिनेमात एन्ट्री, अतुल काळेंकडे दिग्दर्शनाची धुरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी रंगभूमीवरुन पदार्पण करणारा आणि गेली काही वर्षे हिंदीत रमलेला अभिनेता सुमीत राघवन आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘ओरँजेन एन्टरटेन्मेंट’चे विशू गायकवाड आणि मंदार केणी यांची निर्मिती असलेल्या ‘संदूक’मधून सुमीत मराठी सिनेमात प्रथमच नायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

1940च्या दशकातील गोष्ट सांगणारा हा विनोदी सिनेमा अतुल काळे दिग्दर्शित करणार आहेत. एप्रिल महिन्यात या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून शरद पोंक्षे, अरुण नलावडे, सतीश राजवाडे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.

‘संदूक’ची पटकथा अतुल काळे, आशिष रायकर आणि सुबोध खानोलकर यांनी लिहिली असून हृषिकेश जोशी यांचे संवाद आहेत. छायालेखनाची जबाबदारी अजित रेड्डी पार पाडणार असून कला दिग्दर्शन महेश कुडाळकर यांचे असेल. गुरू ठाकूरच्या गाण्यांना अजित-समीर ही संगीतकार जोडी संगीतबद्ध करणार आहेत.

आपल्या पहिल्या सिनेमाविषयी काय म्हणाला सुमीत, जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...