आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone As Laila Lele In Sex Comedy ‘Mastizaade’

आता लैला बनणार सनी, सेक्सी-कॉमेडी \'मस्तीजादे\'मध्ये करणार धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये याकाळात सनी लियोनच्या नावाची बरीच चर्चा आहे. रागिनी एमएमएस 2चे यश असो, किंवा पार्टीत केलेल्या न्यूड डान्सची छायाचित्रे असो, सनीच्या नावाची सर्वच ठिकाणी चर्चा रंगतेय. सनीची ही लोकप्रिया एनकॅश करण्याची ब-याच निर्माते-दिग्दर्शकांची इच्छा आहे. सनीच्या या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचे मिलाप जावेरी यांनी ठरवले आहे. त्यामुळेच त्यांच्या आगामी 'मस्तीजादे' या सिनेमात सनी लैला म्हणून सिल्व्हर स्क्रिनवर अवतरणार आहे. सिनेमात लैला लेले हे तिच्या पात्राचे नाव असणार आहे.
खरं तर आपल्या नावापुढील पॉर्नस्टार रुपकाचे परिवर्तन एका उत्तम अभिनेत्रीच्या रुपात होण्याची इच्छा बाळगणा-या सनी लिओनचा हा आगामी सिनेमा सेक्सी कॉमेडी आहे.
प्रितिश नंदी यांच्या सेक्सी-कॉमेडी 'मस्तीजादे' सिनेमासाठी सनीसोबत लवकरच चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याचे ट्विट रंगिता नंदी हिने केले आहे. 'प्रिटीश नंदी कॉम' या ट्विटर अकाऊंटवरूनही याची पुष्टी करण्यात आली आहे.
हा सिनेमा मिलाप जावेरी दिग्दर्शित करणार असून त्यांनी यापूर्वी 'मस्ती' (2004), 'हे बेबी' (2007), 'ग्रँड मस्ती' (2007) या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे नाव 'मैं तेरा हीरो' आणि 'शूटआउट एट वडाला' या सिनेमांसोबतसुद्धा जुळलेले आहे. त्यामुळे सनीचा सेक्स कॉमेडी अवतरा आणि मिलाप जावेदी यांचे दिग्दर्शन प्रेक्षकांना थिएटरकडे खेचू शकणार आहे. प्रितिश नंदी कम्युनिकेशनचा शादी के साइड इफेक्ट्स हा मागील सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकला नव्हता.

पुढे वाचा, का मिळाली सनीला ही भूमिका?