लवकरच प्रदर्शित होणा-या ‘हेट स्टोरी-2’ या सिनेमामध्ये ‘पिंक लिप्स’ हे आयटम सॉंग करणा-या सनी लिओनकडे रिहर्सल करायला सध्या वेळ नाहीये.
पॉर्नस्टार अभिनेत्री म्हणुन काम केल्यानंतर टीव्ही शोची होस्ट बनलेली सनी आजकाल जयपूरमध्ये एमटीव्हीच्या "स्प्लिट्स व्हिला" या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्यामुळे तिच्या कोरिओग्राफर उमा-गैती या जोडीने जयपूरला धाव घेण्याचा निर्णय घेतला. याच जोडीने सनीच्या ‘बेबी डॉल’ या गाण्याचेदेखील नृत्य दिग्दर्शन केले होते.
ही जोडी आता या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन जयपुरमध्येच करत आहे. त्यानंतर गाण्याचे चित्रीकरण मुंबईला होईल. एका सूत्राकडून कळाले की, ‘सनी शनिवारी मुंबईला जाऊन आपल्या गाण्याचं चित्रीकरण करणार आहे. वेळ कमी असल्यामुळे ती आपल्या शोच्या चित्रीकरणातून वेळ काढून 'पिंक लिप्स'ची प्रॅक्टिस करणार आहे.’
तिला सर्वसाधारण नृत्यकौशल्यदेखील येत नसल्यामुळे तिला या आयटम सॉंगच्या तयारीला वेळ लागेल असं मानलं जात आहे.