सनी लिओन
सनी लिओनने मागील काही दिवसांपूर्वी 'रागिनी एमएमएस 2'मध्ये 'बेबी डॉल' गाण्याने सर्वत्र धूम घातली होती. आता अलीकडेच एक बातमी आली, की 'हेट स्टोरी 2'मध्ये ती 'पिंक लिप्स' गाण्यात दिसणार आहे. मात्र तिच्या चाहत्यांना आणखी एक खुष खबर सनीने दिली आहे. हिंदी सिनेमानंतर सनी आता तामिळ सिनेमातसुध्दा काम करत आहे.
'वडाकरी' या तामिळ सिनेमात एक आयटम नंबर करत आहे. या आयटम नंबरचे बोल 'सनी अम्मा लिप्स, सनी अम्मा हिप्स, इट्स सनी...' असे आहेत. सनी या गाण्यात कोणत्या अवतारात दिसणार याची प्रेक्षकांना प्रतिक्षा लागलीच असावी. अर्थातच सनीचा यावर्षी चाहत्यांना डबल धमाका दिसणार आहे. दोन्ही आयटम नंबरमध्ये सनीचा वेगवेगळा अवतार प्रेक्षकांच्या नजरेस पडणार आहे.
'वडाकरी'मधून दिग्दर्शनास सुरूवात करणा-या राजनच्या या सिनेमात स्वाती आणि जय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या जोडीने 'जर्नी' आणि 'राजा रानी' या तेलगू सिनेमांमध्ये एकत्र काम केलेले आहे. सनी या सिनेमामध्ये एक आयटम नंबर करणार आहे. सोबतच, ती सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारतानासुध्दा दिसणार आहे. संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल अशा सनी लिओनच्या पहिल्याच दक्षिण भारतीय सिनेमाला 'यू' प्रमाणपत्रसुध्दा मिळाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा यापूर्वी सनीची 'वडाकरी' सिनेमातील काही छायाचित्रे समोर आली होती....