आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री सनी लिओनच्या चित्रपटाला 'यू' प्रमाणपत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये पाऊल टाकल्यानंतर सनी लिओनच्या करिअरमधील हा पहिलाच चित्रपट आहे जो, संपूर्ण कुटुंबीयांसोबत पाहता येईल. कारण सनीच्या आजपर्यंतच्या प्रत्येक चित्रपटावर 'ए' प्रमाणपत्राचा शिक्का मारण्यात आला होता.
संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल अशा सनी लिओनच्या पहिल्या दक्षिण भारतीय चित्रपटाला 'यू' प्रमाणपत्र मिळाले आहे. चित्रपटात सनी लिओनचे नाव असल्याचे कळताच तो नक्कीच प्रौढांसाठी असेल, असा अंदाज लावला जातो. 'रागिनी एमएमएस-2', 'मस्तीजादे' किंवा, तिच्या आगामी चित्रपटांबाबतही हाच अंदाज वर्तवता गेला. त्यामुळे सनीच्या आतापर्यंतच्या चित्रपटांना 'ए' प्रमाणपत्र मिळाले. मात्र, नुकतेच सनी लिओनच्या दक्षिण भारतीय चित्रपटाला 'यू' प्रमाणपत्र मिळाले आहे. दक्षिणेमधील चित्रपटात सनीचा हा पदार्पण करणारा चित्रपट ठरला आहे. 'वडाकरी' नावाच्या या तामिळ कॉमेडी-थ्रिलरमध्ये सनीचे एक खास गाणेदेखील समाविष्ट करण्यात आले आहे.
जूनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सेन्सॉर बोर्डाने प्रथमच सनी लिओनच्या चित्रपटाला 'यू' प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे आजपर्यंत सनीचे चित्रपट पाहण्यास बंदी असलेले किशोरवयीन हा चित्रपट पाहू शकतील.