पोर्न स्टारपासून बॉलिवूड अभिनेत्री बनलेली सनी लिओन पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. बातमी आहे, की 'हेट स्टोरी 2'मध्ये सनी एक जबरदस्त आयटम नंबर करणार आहे. या आयटम नंबरचे बोलही तिच्याप्रमाणेच हॉट आहेत, 'पिंक लिप्स'... या गाण्यात पुन्हा एकदा नवीन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
सनीचे हे गाणे अलीकडेच, रिलीज झाले असून त्यामध्ये ती बरीच ग्लॅमरस दिसत आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये ती वेस्टर्न डान्सच्या काही मूव्ह करताना दिसणार आहे.
सनीचे 'रागिनी एमएमएस 2'मधील 'बेबी डॉल' गाणेसुध्दा मीत ब्रदर्सनेच कंपोझ केले होते. या गाण्याच्या माध्यमातून सनीला बरीच लोकप्रियता मिळाली.
बेबी डॉलच्या यशानंतर 'हेट स्टोरी 2'च्या निर्मात्यांना सनीच्या या आयटम नंबरकडून खूप अपेक्षा आहेत. प्रेक्षकांनाही सनीचा हॉट आणि ग्लॅमरस अवतार बघण्याची प्रतिक्षा आहे. आता येणारा काळच सांगेल सनीचे आणि मीत ब्रदर्सचे कॉम्बिनेशन पुन्हा हिट होऊ शकते का?
दिग्दर्शक विशाल पांड्याचा हा सिनेमा 18 जुलै रोजी रिलीज होणार आहे. त्यामध्ये टीव्ही इंडस्ट्रीचे यशस्वी स्टार्स जय भानूशाली आणि सुरवीन चावला मुख्य भूमिकेत आहेत.