आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सनीच्या 'कुल्फी'ची छायाचित्रे रिलीज, साडी-शॉर्ट ड्रेसमध्ये दिसला ग्लॅमरस लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्न इंडस्ट्री ते बॉलिवूड असा प्रवास पार करणारी अभिनेत्री सनी लिओन लवकर रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यास सज्ज झाली आहे. यावर्षी सनीने 'रागिनी MMS 2'मध्ये मुख्य भूमिका साकारून बॉक्स ऑफिसवर आपला सिनेमा हिट केला. आता तिच्या या यशाचा फायदा सरावना राजनला होऊ शकतो. तो सनीला घेऊन 'वडाकरी' हा तेलगू सिनेमा बनवत आहे. या सिनेमाचे डबिंग टायटल 'कुल्फी' ठेवण्यात आले आहे.
'वडाकरी'मधून दिग्दर्शनास सुरूवात करणा-या राजनच्या या सिनेमात स्वाती आणि जय मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या जोडीने 'जर्नी' आणि 'राजा रानी' या तेलगू सिनेमांमध्ये एकत्र काम केलेले आहे. सनी या सिनेमामध्ये एक आयटम नंबर करणार आहे. सोबतच, ती सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारतानासुध्दा दिसणार आहे. या सिनेमाची शुटिंग 19 ऑगस्ट 2013मध्ये सुरू झाली होती. परंतु याची रिलीज डेट निश्चित नव्हती.
अलीकडेच, सिनेमाचे पोस्टर आणि संबंधित फोटो रिजील करण्यात आले आहेत. त्यामध्ये सनीसह स्वाती आणि जयसुध्दा दिसत आहेत. या छायाचित्रांमध्ये सनी शॉर्ट ड्रेस, साडी अशा विविध अवतारात दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'वडाकरी' (कुल्फी)मधील सनीच्या नवीन अवताराची छायाचित्रे...