आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: मासिकाच्या कव्हर पेजवर सनी, पोहोचली लाँचिंग इवेंटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रागिनी MMS 2' या सिनेमाच्या यशानंतर सनी लिओन आनंदी दिसत आहे. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. त्यामुळे सनीच्या लोप्रियतेची आणि सिनेमाच्या यशाची प्रत्येकजण प्रशंसा करत आहे. पुरूषांसाठी प्रकाशित होणा-या 'मॅनडेट' मासिकाने यावेळीच्या अकांच्या कव्हर पेजवर सनीला विशेष स्थान दिले आहे. हा अंक एप्रिल महिन्यासाठी प्रकाशित केला गेला आहे.
या मासिकाच्या कव्हर पेजला सनी लिओनने लाँच केले असून या कव्हरवर तिचे छायाचित्र दिसून येत आहे. त्यामध्ये तिने एका पुरूषाच्या गळ्यात पट्टा अडकवून पकडले आहे. कव्हर पेजवर 'भारतीय आदमी इतने डरे हुए क्यो होते है' असे लिहीलेले आहे.
या कार्यक्रामादरम्यान सनीने आपला अनुभव शेअर केला. सोबतच, तिने लोकांच्या प्रश्नाचे उत्तरेसुध्दा दिलीत. ती पती डेनिअल वेबरसोबत या कार्यक्रमात पोहोचली होती. अभिनेता राजीव पॉलसुध्दा कार्यक्रमात उपस्थित होता.
'जिस्म 2' सिनेमामधून सनीने ब़ॉलिवूडमध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. त्यानंतर तिने 'जॅकपॉट' आणि 'रागिनी MMS 2'मध्ये अभिनय करून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सनी लिओनची या कार्यक्रमातील छायाचित्रे...