आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनीने रॅम्पवर कॅटवॉकसह केला डान्स, पाहा इवेंटचे खास PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टेजवर थिरकताना सनी लियोन
मुंबई - बॉलिवूडची बेबी डॉल बनलेली अभिनेत्री सनी लियोनने हिंदी फिल्म इंडस्ट्रीत ओळख निर्माण केली आहे. सिनेमांसोबतच अनेक सार्वजनिक ठिकाणी तिची हजेरी आवर्जुन असते. सोमवारी मुंबईतील शीशा लाउंजमध्ये आयोजित एका इवेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिने ट्रेडिशनल ड्रेस परिधान करुन रॅम्पवर कॅटवॉक केला. याशिवाय स्टेजवर ती थिरकलीसुद्धा.
या इवेंटमध्ये सनीने रोहित वर्माने डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. यावेळी रोहितने डिझाइन केलेले नववधूचे पोशाख परिधान करुन मॉडेल्स रॅम्पवर अवतरल्या होत्या. सनीसह कोयना मित्रा, मृणाल जैन, पूनम ढिल्लन, डेजी शाह, रश्मि देसाई, मिंक बरार, नंदीश संधू, काम्या पंजाबी, किश्वर मर्चेंट आणि मिस इंडिया वर्ल्डवाइड मोनिया गिल सहभागी झाली होती.
सनी लियोनचा 'रागिनी MMS 2' हा सिनेमा सुपरहिट ठरला. तिच्या लोकप्रियतेचा फायदा अनेक दिग्दर्शक घेत आहेत. याच कारणामुळे हिंदीसह अनेक साउथ सिनेमांच्या ऑफर्स तिला येत आहेत. यावर्षी सनी 'हेट स्टोरी 2' मधील 'पिंक लिप्स' या गाण्यासह 'टीना अँड लोलो', 'मस्तीजादे' आणि तामिळ सिनेमा 'वडाकरी'मध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा रोहित वर्माने आयोजित केलेल्या या इवेंटची खास झलक...